Friday, August 28, 2026

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ एकच उडाली आहे. विनोद विष्णू शेंद्रे (वय ३४) असे मयत तरुणाचे नाव आहे. (Nashik Crime News)

मयत विनोद विष्णू शेंद्रे हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून ओझर येथे एका किराणा दुकानात काम करत होता. तो कमोद फोटो स्टुडिओसमोर असलेल्या घरात एका मित्रासह भाड्याने राहत होता. गुरुवारी सकाळी त्याचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. मयताच्या मानेवर गळा आवळल्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्याने हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश कुलकर्णी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) गुन्हा दाखल दाखल झाला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Nashik Crime News)

पत्नी अन् वडिलांना सॉरी'चा शेवटचा मेसेज अन्...

दुसरीकडे, नाशिकच्या पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर 'सॉरी' असा मेसेज पाठवून गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव असून तो नाशिकच्या पेठरोड परिसरातील (Nashik Crime News) समर्थनगर येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मयत शुभम पवार हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने अज्ञात कारणावरून गोदा पार्कजवळील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली. नदीत उडी मारण्यापूर्वी शुभमने आपल्या पत्नीला आणि वडिलांना मोबाईलवर 'सॉरी' असा मेसेज पाठवला होता. बुधवारी दुपारी गोदा पार्कजवळ गोदावरी नदीच्या पात्रात स्थानिक नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला त्यावेळी नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. (Nashik Crime News)

घटनेचे गांभीर्य ओळखून पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchavati Police Station) पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मृतदेह शुभम पवार याचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनं शुभम पवारच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार संदीप बाविस्कर या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >