अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आणीबाणीचा सामना करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ला झाल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी अयोध्येत NSG चे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ...
दहशतवादी हल्ला झाल्यास तातडीने योग्य ती कारवाई करणे शक्य व्हावे यासाठी निवडक संवेदनशील जिल्ह्यात NSG ची (National Security Guard) प्रादेशिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. या योजनेनुसार मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि जम्मू येथे या सहा ठिकाणी NSG ची (National Security Guard) प्रादेशिक केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आता अयोध्येत NSG चे प्रादेशिक केंद्र सुरू होत आहे. हे NSG चे देशातले सातवे प्रादेशिक केंद्र असेल.
काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत १०५ भारतीय पर्यटकांशी संपर्क ...
सुरक्षेशी संबंधित कोणत्याही आणीबाणीचा सामना करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ला झाल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी NSG कमांडो प्रशिक्षित असतात. त्यांच्याकडे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी शस्त्रे, गोळ्या- दारूगोळा, आधुनिक यंत्रणा असते. एनएसजीच्या प्रादेशिक केंद्रामुळे उत्तर प्रदेशच्या पोलीस यंत्रणेला कमांडोंशी समन्वय साधून सुरक्षा यंत्रणा आणखी सक्षम करता येणार आहे. ग्रुप कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एनएसजीचे एक पथक अयोध्या येथील प्रादेशिक केंद्रावर वर्षातील ३६५ दिवस चोवीस तास उपलब्ध असेल.
नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ...
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुरुग्रामच्या मानेसर येथे एनएसजीच्या ४१ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लवकरच अयोध्येत NSG चे (National Security Guard) प्रादेशिक केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. एनएसजीने १९८४ पासून आतापर्यंत 'ऑपरेशन अश्वमेध', 'ऑपरेशन वज्रशक्ती' आणि 'ऑपरेशन धांगू' यांसारख्या मोहिमांमधून, तसेच अक्षरधाम हल्ला आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यांदरम्यान शौर्य आणि कार्यक्षमतेने राष्ट्राचे रक्षण केले आहे. एनएसजीच्या जवानांनी देशभरातील ७७० हून अधिक महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली असून, संभाव्य दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक योजनांसह एक डेटा बँक तयार केली आहे. याशिवाय, एनएसजीने रुग्णालये, धार्मिक स्थळे, इतर महत्त्वाच्या संस्था, जलमार्ग आणि भारताची संसद यांच्या सुरक्षेचे काळजीपूर्वक नियोजन केले आहे.
Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, मार्च २०२७ ...
एनएसजी हे गृह मंत्रालयाचे नोडल राष्ट्रीय दहशतवादविरोधी दल आहे, जे सर्व प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवाया हाताळते. एनएसजी हे विशिष्ट परिस्थिती हाताळण्यासाठी विशेषतः सुसज्ज आणि प्रशिक्षित केलेले दल आहे आणि म्हणूनच, गंभीर दहशतवादी कृत्ये हाणून पाडण्यासाठी त्याचा वापर केवळ अपवादात्मक परिस्थितीतच केला जातो.




