- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके
मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंगळवारी केली. राज्यातील आदिवासी समाजाच्या आमदार, खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उईके यांनी ही माहिती दिली. (Tribal Hostel Age Limit Removed)
मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण प्रश्न असा आहे भारताची शिक्षणव्यवस्था ...
राज्य शासनाने अलीकडेच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट लागू करण्यात आली होती. वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ही अट रद्द करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री उईके यांनी दिली. विशेष म्हणजे प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. (Tribal Hostel Age Limit Removed)






