मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. (Vaishali Nagwade)
यावेळी नागवडे यांनी अजित पवार यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिले. ‘दादा... तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही भगिनी कार्यकर्त्या कायम प्रयत्नशील राहू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महिला कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे आणि महिलांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विश्वासाची साथ द्यावी, अशी विनंती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना केली. (Vaishali Nagwade)
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, नेते उमेश पाटील, आमदार इद्रीस नायकवडी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधली. (Ajit Pawar)
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत केलेल्या कारवाईचे ...
वैशाली नागवडे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते जय पवार यांच्यासह पक्षातील सात मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि सर्व आमदारांना पत्र व राखी पाठवली आहे. महिलांच्या सामाजिक आणि राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. (Ajit Pawar)
दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून अजित पवार यांच्या निधनाला सात महिने पूर्ण होत असल्याचे नागवडे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील शक्य तितक्या महिला कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी किंवा आपापल्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला राखी अर्पण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रदेश प्रतिनिधी सुनिता शिंदे, सुरेखा पेडणेकर, मुंबई अध्यक्षा आरती साळवी यांच्यासह राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.





