Wednesday, August 19, 2026

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे,’ असे म्हटले. गोर म्हणाले, “काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे.” उमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत माध्यमांशी बोलताना गोर म्हणाले, “आमची भेट अतिशय चांगली झाली. आमचे संबंध आणखी मजबूत करण्याची आमची इच्छा आहे.” दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर तसेच मे २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर काश्मीरला भेट देणारे सर्जिओ गोर हे अमेरिकेचे उच्चपदस्थ राजनयिक आहेत.

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, बैठक अतिशय चांगली झाली. या बैठकीत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर चर्चा झाली. विशेषतः अमेरिका जम्मू-काश्मीरसाठी काय करू शकतो, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.उमर अब्दुल्ला म्हणाले की, काही जुने मुद्दे आहेत. ते कालांतराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, ही चर्चा पुढेही सुरू राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील चर्चा सर्जिओ गोर आणि अमेरिकेच्या पातळीवरही सुरू राहील. त्याचवेळी, आपण स्वतः नवी दिल्लीमध्ये भारत सरकारसोबत ही चर्चा पुढे नेणार आहोत. येत्या काही वर्षांत अमेरिका आणि जम्मू-काश्मीरमधील संपर्क व सहकार्य अधिक वाढेल आणि हे संबंध आणखी मजबूत होतील, अशी अपेक्षा उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >