Nashik News : सिडको येथील स्टेट बँक चौपाटीलगत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेच्या सिडको अतिक्रमण विभागाने (CIDCO Encroachment Department) कारवाई केली आहे. या कारवाईत ७ ते ८ अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या हटवण्यात आल्या आहे. सदर रस्त्यावरील हातगाडी व टपरी चालकांना स्वहस्ते अतिक्रमण हटवण्याबाबत मनपा प्रशासनाकडून (Municipal Corporation Administration) वारंवार पूर्वसूचना (नोटीस) देण्यात आली होती. मात्र, वारंवार पूर्वसूचना देऊन आणि मुदत संपूनही अतिक्रमण न हटविल्याने अखेर बुधवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण निष्कासित केले.
बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे (Suvarna Dakhane) यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम राबविण्यात आली. सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे व आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे गाडी प्रमुख निखिल तेजाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. (Nashik News)
२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्याबाबत उच्च ...
मोहीम सुरुच राहणार , मनपाचा इशारा
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक कर्मचारी आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांविरोधात ही मोहीम आगामी काळातही अशाच प्रकारे नियमितपणे सुरू राहील, असा स्पष्ट इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून (CIDCO Encroachment Department) देण्यात आला आहे.(Nashik News)
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील पूल कोसळल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला ...
द्वारका परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
दरम्यान, द्वारका चौकात सध्या अंडरपासच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे आणि त्यासाठी वाहतुकीत विविध बदल करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत परिसरात पुन्हा अतिक्रमण वाढल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्याच्या कडेला फेरीवाले, अनधिकृत स्टॉल, दुकानांचे वाढीव शेड तसेच बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. आधीच अंडरपासच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असताना अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेने कारवाईनंतर नियमित देखरेख न ठेवल्याचा आरोप केला आहे. (Nashik News)
Railway Alarm chain pulling : रेल्वेने मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये दिलेली 'अलार्म चेन पुलिंग' (ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. मात्र, अलीकडच्या काळात या ...
अतिक्रमणमुक्त परिसर राखणे आवश्यक
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पादरम्यान प्रशासनाने अतिक्रमणमुक्त परिसर राखणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नियमित अतिक्रमण हटाव मोहीम, वाहतूक नियोजन आणि कडक अंमलबजावणी केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.






