Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या कामामुळे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या संदर्भात १० ऑगस्टनंतर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि महारेलचे अधिकारी संयुक्त पाहणी करून अंतिम वाहतूक आराखडा निश्चित करणार आहेत. (Jalgaon News )
१५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले ...
सविस्तर आराखडा तयार होणार
जळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि पुलाच्या संरचनेचे काम हाती घेतले जाणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून वाहतूक कोणत्या मार्गाने वळवायची, कोणत्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायचे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करायची, याचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.(Jalgaon News )
Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) १३ ऑगस्टपासून पुन्हा ...
शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी पर्यायी मार्ग
प्राथमिक नियोजनानुसार शहरातून जाणारी अवजड वाहने पाळधी–तरसोद बायपास मार्गे (Paldhi-Tarsod Bypass Road) वळविण्याचा प्रस्ताव आहे. तर शहरातील चारचाकी, दुचाकी आणि इतर हलक्या वाहनांसाठी पिंप्राळा, गणेश कॉलनी आणि निमखेडी शिवार हे पर्यायी मार्ग वापरण्याचा विचार सुरू आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, पर्यायी रस्ते आणि इतर उपाययोजनांचे नियोजनही करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्येक मार्गाची रुंदी, वाहतूक क्षमता आणि तांत्रिक बाबींची पाहणी केली जाणार आहे. (Jalgaon News )
Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी ...
पावसाळा संपताच कामाला वेग दिला जाणार
शिव कॉलनी उड्डाणपूल (Flyover) आणि भुयारी मार्गाच्या (Underpass) संथ कामामुळे नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. वाढती वाहतूक, धुळीचे साम्राज्य आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी महारेल प्रशासनाला पत्र पाठवून कामाला गती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर चार महिन्यांनी महारेलचे सल्लागार अरविंद पटेल यांनी महापौरांची भेट घेऊन संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. (Jalgaon News )
सध्या पावसामुळे मोठे बांधकाम थांबविण्यात आले असले तरी पावसाळा संपताच कामाला वेग दिला जाणार आहे. त्यामुळे काही काळ जळगावकरांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार असला, तरी भविष्यात शिव कॉलनी परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.




