Wednesday, July 29, 2026

Nashik : नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग वाढवला; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग वाढवला; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढत असल्याने बंधाऱ्यातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी (दि. २९) दुपारी ३ वाजता विसर्ग १५,६५५ क्युसेकवरून १७,२६९ क्युसेक करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.

गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जलसंपदा विभागाने जारी केलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठावर कोणतेही साहित्य ठेवू नये, तसेच जनावरेही नदीकाठापासून सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. जलसंपदा विभाग (Water Resources Department) परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

३ वाजता इतर धरणांतील विसर्ग ( in Cusecs)

गंगापूर - 3276

कादवा - 2319

भावली - 481

पालखेड - 722

वाघाड - 649

तिसगाव - 100

होळकर ब्रिज - 3348

दारणा - 5408

कश्यपी - 1000

भाम - 1057

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >