Wednesday, July 29, 2026

Action movie : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला १६०० कोटींचा सिनेमा, मात्र OTT वर येताच ठरला जगभरात नंबर वन!

Action movie : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला १६०० कोटींचा सिनेमा, मात्र OTT वर येताच ठरला जगभरात नंबर वन!

मुंबई:

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची निराशा आणि बॉक्स ऑफिसवर अब्जावधींचा तोटा सोसल्यानंतर, एका मोठ्या अ‍ॅक्शन सिनेमाने थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करत सर्वांना थक्क केले आहे. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला सुमारे १६०० कोटींचा अ‍ॅक्शनपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होताच जागतिक स्तरावर धुमाकूळ घालत आहे.

बॉक्स ऑफिसवर फक्त ११०० कोटींचीच कमाई :

सुमारे १६०० कोटींचा हॉलीवूड अ‍ॅक्शन चित्रपट ५ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे एकूण निर्मिती बजेट अंदाजे १७० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १६२६ कोटी रुपये होते. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट केवळ ११४ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे १०९० ते ११०० कोटी रुपये) इतकीच कमाई करू शकला. नफा मिळवण्यासाठी या चित्रपटाला किमान ४०० ते ५०० दशलक्ष डॉलर्सच्या कमाईची गरज होती, परंतु तो आपले लक्ष्य गाठण्यात कमी पडला आणि बॉक्स ऑफिसवर अयशस्वी घोषित झाला.

ओटीटीवर जागतिक स्तरावर अव्वल :

चित्रपटगृहांमधील निराशाजनक कामगिरीनंतर हा चित्रपट 'अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ' (Amazon Prime Video) वर प्रदर्शित करण्यात आला. ओटीटीवर येताच या चित्रपटाने डिजिटल जगात इतिहास रचला आहे आणि तो जगभरात नंबर वन ठरत आहे. जादू, थरारक अ‍ॅक्शन आणि फँटसीने नटलेला हा सिनेमा घरबसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ट्रॅव्हिस नाईट(Travis Knight) यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्रिन्स ॲडमची आहे, जो पृथ्वीवर मोठा होतो आणि नंतर ही-मॅन बनण्यासाठी इटरनियाला परत येतो. तिथे त्याला स्केलेटरशी लढावे लागते.

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी का नाकारले? 

चित्रपटाच्या अपयशामागे सर्वात मोठे कारण त्याचे अवाढव्य बजेट मानले जात आहे. 'ही-मॅन अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स' (He-Man and the Masters of the Universe) या ८० च्या दशकातील प्रसिद्ध खेळणी आणि कार्टून फ्रँचायझीवर आधारित हा चित्रपट होता. जुन्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही संकल्पना आजच्या नवीन पिढीला फारशी आकर्षित करू शकली नाही. जरी थिएटरमध्ये(Theatre) प्रेक्षक कमी आले असले, तरी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना तो खूप आवडला. 'रॉटन टोमॅटोज' या प्रसिद्ध रिव्ह्यू वेबसाईटवर समीक्षकांनी या चित्रपटाला ६७% आणि प्रेक्षकांनी ८६ ते ८८ % असा चांगला स्कोर दिला आहे. याचा अर्थ ज्यांनी तो पाहिला त्यांना तो आवडला.

OTT वर सुपरहिट :

बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरूनही, ॲमेझॉनने हा चित्रपट लगेचच स्ट्रीमिंगवर आणला. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४७ दिवसांनी, २२ जुलै २०२६ रोजी तो प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झाला. आणि प्रदर्शित होताच, हा चित्रपट जगभरात ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि अनेक देशांमधील चार्ट्समध्ये अव्वल ठरला. प्रेक्षक आता आपल्या घरात बसून ही-मॅनच्या शक्तीचा आनंद घेत आहेत.

१९८७ च्या डॉल्फ लुंडग्रेनच्या चित्रपटानंतर आलेला हा दुसरा लाईव्ह-ॲक्शन रूपांतरित चित्रपट आहे. स्ट्रीमिंगच्या जगात काहीही शक्य आहे. जे चित्रपट अनेकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >