Wednesday, July 29, 2026

Nashik News : नाशिकमध्ये शस्त्र व जमावबंदीचे आदेश, कारण काय आणि आदेश कधीपर्यंत ?

Nashik News : नाशिकमध्ये शस्त्र व जमावबंदीचे आदेश, कारण काय आणि आदेश कधीपर्यंत ?

Nashik News  : नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यासाठी पोलिसांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. (Arms and curfew orders)

11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदीचा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशातून कोणाला सवलत आहे ?

धार्मिक व सामाजिक कार्यक्रम: लग्नकार्य, मिरवणुका आणि प्रेतयात्रा.

व्यापार: आठवडी बाजार.

अधिकृत परवानग्या: ज्या सभा किंवा मिरवणुकांसाठी प्रशासनाची रितसर परवानगी घेतली आहे.

सरकारी कर्मचारी: ऑन-ड्यूटी पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >