Nashik : टी.जे.एस.बी. सहकारी बँकेची (T.J.S.B. Sahakari Bank) तब्बल ३८ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बाफना ज्वेलर्सचे (Bafna Jewellers) संचालक निलेश बाफना यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दुकानात प्रत्यक्षात २५ लाख १९ हजार रुपयांचा माल असताना ५९.६५ कोटी रुपयांचा सोने, चांदी आणि हिऱ्यांचा साठा असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वारंवार कर्ज घेतल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
Nashik : नाशिकमधील एका भाजप आमदाराचं WhatsApp हॅक झाल्याची घटना घडली आहे. तुमची शॉपिंग डिलिव्हरी आली आहे. तुमचा पत्ता सांगण्यासाठी या नंबरवर डायल करा, असा फोन ...
यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
या प्रकरणात बाफना ज्वेलर्सचे संचालक निलेश बाफना, सुभाष बाफना, नम्रता बाफना आणि प्रभावती बाफना (सर्व रा. बाफना हाऊस, गायकवाडनगर, तिडके कॉलनी) तसेच जामीनदार कांतिलाल बाफना (अगम बंगला, तिडके कॉलनी) आणि सरला बाफना यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातसह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाचे थैमान नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा मंदावलेला नैऋत्य मान्सून आता देशभरात पूर्णपणे ...
कर्जफेडीशी संबंधित व्यावसायिक वाद असल्याचा युक्तिवाद
जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने हा केवळ कर्जफेडीशी संबंधित दिवाणी व व्यावसायिक वाद असल्याचा युक्तिवाद केला. बँकेने वसुलीची प्रक्रिया सुरू केली असून मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. तसेच बँकेला ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत करण्यात आली असून १०.२१ कोटी रुपयांचे दुसरे कर्जही पूर्णपणे फेडण्यात आल्याने फसवणुकीचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा करण्यात आला. तपासादरम्यान सर्व सहकार्य केल्यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली.
मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक होणार
महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे ...
सार्वजनिक निधीची नियोजनबद्ध फसवणूक
मात्र, सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादात संशयितांनी ५९.६५ कोटी रुपयांचा मौल्यवान साठा असल्याचा बनावट अहवाल बँकेसमोर सादर केल्याचे नमूद केले. प्रत्यक्ष तपासणीत मात्र केवळ २५.१९ लाख रुपयांचा माल आढळून आला. सुमारे ५९.४० कोटी रुपयांचा मौल्यवान साठा गायब असल्याने हा केवळ कर्ज थकबाकीचा विषय नसून सार्वजनिक निधीची नियोजनबद्ध फसवणूक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे ...
निलेश बाफना यांचा जामीन अर्ज फेटाळला
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत निलेश बाफना (Nilesh Bafna) यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सुमारे ५९ कोटी रुपयांच्या साठ्यातील तफावत अत्यंत गंभीर असून हा केवळ व्यावसायिक अपयशाचा विषय नसून बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेली आर्थिक फसवणूक असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच गायब झालेला मौल्यवान साठा अद्याप हस्तगत झालेला नसल्याने आरोपीला जामीन दिल्यास पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.






