Thursday, July 23, 2026

Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार ! गोदावरीला पूर ; ‘दुतोंड्या मारुती’च्या कमरेपर्यत पाणी

Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार ! गोदावरीला पूर ; ‘दुतोंड्या मारुती’च्या कमरेपर्यत पाणी

Nashik : नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले दुथडी भरुन वाहत असून काही ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरल्याने या हंगामात गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गुरुवारी सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले.

गंगापूर धरणातून 7,413 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

नाशिक शहर परिसरात मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु असून बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा पाणी विसर्ग एकूण ३१६५ क्युसेक इतका करण्यात आला आहे. हा विसर्ग ज सकाळी ९.३० वाजता ४२३६ क्युसेक करण्यात आला. तसेच नंतर पुन्हा त्यात वाढ करण्यात आली असून सकाळी १०.३० वाजता एकूण विसर्ग ५२९५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तर सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील कडवा, भावली, पुनेगाव, हरणबारी ही धरणे पूर्ण भरली असून त्यांच्यातून विसर्ग सुरु आहे. याशिवाय दारणा धरणातून होत असलेल्या विसर्गात सकाळी ९ वाजता ७४६४ ने वाढ करण्यात आल्याने धरणातून आता १५४९८ क्युसेक विसर्ग सुरु आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणी छत्रपती संभाजीनगरसाठी महत्वाच्या असलेल्या जायकवाडीच्या दिशेने जाते. नांदूर मध्यमेश्वरमधून १३,४०७ क्यूसेकने विसर्ग सुरु होता.

त्र्यंबकेश्वरमध्ये वाऱ्याने पत्रे उडून ३ भाविक जखमी

ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर परिसरात बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्याने एका घराचे पत्रे उडाले. मेनरोडवरून जाणाऱ्या भाविकांवर ते पडले. या दुर्घटनेत ३ भाविक जखमी झाले असून, यवतमाळ येथील अमित आढे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >