दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक केमिकल टँकर फुटला, दुर्घटनेत एकाचा मृत्यू
मुंबई : चेंबूर (Chembur) पूर्व येथील मुकुंद नगर परिसरात केमिकल टँकरवर देखभालीचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. (Mumbai News)
सीएसएमटी स्थानकावर धक्कादायक प्रकार; एक्स्प्रेसमध्ये आढळला मानवी पायाचा तुकडा, पोलीस तपास सुरु मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ...
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुकुंद नगर, म्हाडा वसाहत, म्हैसूर कॉलनीजवळ घडली. केमिकल टँकरवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा, बेस्ट आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Chembur News)
या दुर्घटनेत चार जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी एका जखमीचा लोकमान्य टिळक महानगरपालिका (सायन) रुग्णालयात उपचारादरम्यान ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. (Chmebur Tanker Explosion)
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ...





