मुंबई : विठ्ठलाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा (BJP) प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विठू माऊलीचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी राऊत यांनी समस्त वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
बारामती : जेजुरीतील भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच पुणे (Pune) जिल्ह्यात वारीदरम्यान आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. बारामतीजवळ मध्यरात्री भरधाव ...
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाबाबत बोलताना संजय राऊत यांनी संयम राखायला हवा होता. विठ्ठल मंदिराचे पावित्र्य ज्यांना माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत. विठू माऊलीचा अपमान केल्याबद्दल महाराष्ट्र त्यांना धडा शिकवेल." (Navnath Ban)
यावेळी त्यांनी राऊत यांच्या रामरक्षा आंदोलनाच्या वक्तव्यावरही पलटवार केला. "प्रथम जय श्रीराम म्हणणे हरामखोरपणा असल्याबद्दल आणि प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेससोबत राजकारण केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागावी. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील," असे बन म्हणाले. (Vithoba controversy)
देवेंद्र फडणवीस राममंदिर (Ram Mandir) आंदोलनात सहभागी होते आणि त्यांना त्यावेळी तुरुंगवासही झाला होता, असा दावा करत बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Sanjay Raut Vitthal statement)
लातूर : लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामांकित एम.जे. हॉस्पिटल (M.J. Hospital) येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) डॉ. मेहुल ईश्वर राठोड ...
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. "महिला आरक्षण विधेयकाला बहुतेक पक्षांचा पाठिंबा आहे. फक्त संजय राऊत यांच्या विरोधाने काहीही फरक पडणार नाही. हे विधेयक निश्चित मंजूर होईल," असे ते म्हणाले. (Pandharpur)
कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले. (Amit shah)






