Nashik Crime News : इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून तसेच कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गुंडाच्या हैदोसाचा आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावरती ४ ते पाच वेळा जीवघेणा हल्ला करून महिलेचा विनयभंग त्रास देणाऱ्या या गुंडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातातील टवाळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे. (Nashik Crime News)
हा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून हायवेवर पडताना दिसतोय. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. आता त्याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केल्याची माहिती आहे. (Nashik Crime News)
दरम्यान, नऊ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केले आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपींची नावे समोर आलेली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. काही आरोपी वाडा, भिवंडी परिसरात तर काहीजण लॉजमध्ये बनावट नावाने वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी आज (दि.१५) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाईल. अटकेतील सर्व संशयित इगतपुरी परिसरातील आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात एका खलबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या एका ...
अटकेतील आरोपींची नावे
अनिरुद्ध विठोबा भागडे (२५, रा. नांदगाव सदा), अर्जुन चिंधू आडोळे (२५, रा. माणिकखांब), विशाल मच्छिंद्र भटाटे (२७, रा. गिरणारे), अनिकेत गणेश मानवेढे (२४, रा. गिरणारे), सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (२२, रा. माणिकखांब), विनोद लक्ष्मण बोराडे (२६, रा. इगतपुरी गावठा), सचिन दत्तू आडोळे (२९, रा. माणिकखांब), देवीदास कचरू भगत (२५, रा. बलायदुरी), अजय भूषण दालभगत (२०, रा. देवळे, घोटी) यांना अटक करण्यात आली असून, कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू फरार आहेत. आकाशवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात जामीन मिळाला आहे. (Nashik Crime News)
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी ...
महिलेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
दरम्यान, आपल्यावर ओढवलेल्या थरारक प्रसंगाचा घटनाक्रम या महिलेनं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. महिलेनं सांगितलं की, परवा आम्ही फिरायला गेलो होतो. दुपारी 2 वाजता इच्छित स्थळी पोहोचलो. आमच्या मुलांनी धबधबा एन्जॉय केला. त्यानंतर मी कपडे बदलायला गेले, त्यावेळी माझ्यावर दोन जणांनी कमेंट पास केली. त्यानंतर त्यांनी परत माझ्यावर कमेंट केली. नेमकं काय झालंय हे पाहायला मग माझे पती आले आणि त्यांनी या गुडांना जाब विचारला. त्यावेळी आमच्यासमोर एका दुकानावर 8 ते 10 जण उभे होते. त्यांनी माझ्या पतीसोबत हातपाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे एक बलेनो गाडी आली, त्यातून एकानं हातानं आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. पुढे गेल्यावर त्यांनी आमचा पाठलाग केला. रॉडनं आमच्या गाडीवर हल्ला केला. (Nashik Crime News)
पहिल्यांदा आमच्यावर भावली डॅम इथं या गुडांनी हल्ला केला. नंतर टोल नाक्यावर हल्ला केला, नंतर पुन्हा दगड मारून हल्ला केला. शेवटी आम्ही जीव वाचवण्यासाठी बॅरिकेड्स तोडून तिथून पळालो. नंतरही ते आमच्या पुढे आले. मग आम्ही मुंबईच्या बाजूला गाडी वळवली आणि पळालो. त्यातील एक जण आमच्या गाडीला लटकला. आम्ही थांबू सुद्धा शकत नव्हतो. मागून बलेनो कार पुन्हा आमचा पाठलाग करत होती. नंतर काही स्थानिक लोक आमच्या रस्त्यात उभे होते, त्यांच्याकडं आम्ही मदत मागितली. त्यानंतर मागून आलेल्या मुलाने मला धरलं. त्याठिकाणी झटापटीत माझी सोन्याची चैन हरवली. तिथून आम्ही थेट अंबड पोलिस स्टेशन पोहोचलो. या ठिकाणी आल्यानंतर झिरो FIR ने गुन्हा दाखल झाला. (Nashik Crime News)
Nashik : नाशिक–पेठ मार्गावरील सावळघाटात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव ट्रक ...
काल स्पॉट पंचनामा झाला. पोलिसांनी आम्हाला दोन गाड्यांचं संरक्षण दिलं. या गुंडांना मुली, बायका काहीच दिसत नव्हतं, आम्ही जर तिथं थांबलो असतो तर आमच्या कुटुंबापैकी कोणाचा मृत्यू झाला असता माहीत नाही. आम्ही 20 ते 30 किलोमीटरपर्यंत मरण बघत आलो. त्यांना खूपच राग होता तर त्यांनी एकदा मारलं असतं. पण 30 किलोमीटर पाठलाग करून त्यांना आमचा मर्डर करायचा होता. आम्ही पोलिसांना फोन केला, मात्र रेंज नव्हती. केस दाखल करू नका यासाठी एका अज्ञात व्यक्तीनं आम्हाला 10 लाख रुपयांची ऑफरही दिली. (Nashik Crime News)
असा अंगावर काटा आणणारा थरारक प्रसंग पीडित कुटुंबातील महिलेनं पत्रकार परिषदेत कथन केला. तसंच गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी या पीडित कुटुंबीयांनं पोलिसाकडं केली आहे. तसंच पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं, असंही या पीडित महिलेनं म्हटलं आहे. (Nashik Crime News)
Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या (Shehzad Bhatti) सोशल मीडिया नेक्सस प्रकरणात नाशिक एटीएसच्या तपासातून ...
नेमकं प्रकरण काय ?
नाशिक शहरातील एक कुटुंब रविवारी ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेलं होतं. फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना कुटुंबातील एका महिलेची दोन टवाळखोरांनी छेड काढली.. या प्रकारावर संतापलेल्या त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद कुटूंबीयांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली धक्कादायक म्हणजे वार घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न हुल्लडबाजांनी केला. कित्येक किलोमीटर त्यांचा पाठलाग केला सोबतच त्यांना मारहाणही करण्यात आली. (Nashik Crime News)
तर पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर काही सुरक्षेचे उपाय राबविण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉइंट निश्चित केला जाईल. मोबाइल व्हॅनही तैनात असेल. याशिवाय ११२ डायल प्रणालीचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक पर्यटनस्थळी पोलिसांचे हेल्पलाइन दर्शविणारे फलक लावले जातील. पर्यटनस्थळी दिवसा पोलिस ठाणेनिहाय पेट्रोलिंग वाढविण्यावर भर दिला जाईल.






