Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात एका खलबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रहिवासी असलेल्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. फिरून झाल्यानंतर ये घरी जाण्यासाठी निघाले मात्र दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. त्यानंतर ८ ते १० किलोमीटर पुढे त्यांचा थरारक पाठलाग कर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून नऊ आरोपीना ताब्यात घेतले आहे.
- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण ...
त्यादिवशी नेमकं काय घडलं
नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत सांगितले की, भावली धरण येथे जी घटना घडली होती, त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला विनय भंग, गाडीची काच फोडणे,हल्ला करणे, विनय भंग, attempt to murder सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी, नांदगाव सदो, माणिक खांब इतर परिसरात हे आरोपी असून आतापर्यंत 9 आरोपी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न झाले असून यामधील 1 आरोपी भोईर नामक याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात कडक कलम लाऊन पर्यटनावर परिणाम होणार नाही अशी कडक कारवाई केली आहे.
Nashik Crime : पाऊस झाल्यानंतर नाशिकमधील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पर्यटन ...
आरोपींना मदत करणारेही आरोपीच
पुढे ते म्हणाले, की त्यादिवशी वादावादी झाली होती तेथून पुढे 7-8 किलोमिटर पुढे झाली होती. वादाचे कारण एक इसमाने शिट्टी वाजवली होती तिथून ते निघून गेले त्यांनंतर हा वाद आणखी पुढे वाढला. महत्वाचे बंदोबस्त आपण वाढवला आहे, अशी घटना घडणार नाही त्यानुसार खबरदारी घेतली जाईल. व्हिडिओच्या माध्यमातून आणि तांत्रिक विश्लेषणातून या आरोपींना ताब्यात घेतले असून अंबड पोलिस स्टेशन येथे पहिले गुन्हा रजिस्टर झाला त्यानंतर हा गुन्हा इगतपुरी स्टेशनकडे वर्ग झाला. सुरुवातीला फक्त बाचाबाची झाली आणि त्या नंतर पुढे 7-8 किलोमीटर हा वाद वाढला. १ आरोपीचा तपास सुरू आहे तर आणखी काही आरोपींची नाव निष्पन्न झाले आहे त्यांचा तपास सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी या आरोपींना मदत केली त्यांना देखील आपण आरोपी करणार आहोत अशी माहिती नाशिकचे एस. पी डी. एस स्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान घडलेल्या या प्रकाराने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.






