मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 4 हजार रेंजर्स, पोलीस आणि फ्रंटियर कॉर्प्सचे जवान तैनात केले असून, बुधवारी मुझफ्फराबादकडे निघणाऱ्या मोठ्या मोर्चामुळे तणाव अधिक वाढला आहे. (POK Protest)
पाकिस्तानने जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी (JAAC) या संघटनेला प्रतिबंधित आणि सशस्त्र संघटना घोषित केले असले, तरी संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले आहे. JAACच्या दाव्यानुसार, सुमारे 40 हजार आंदोलक मुझफ्फराबादकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. ( Muzaffarabad Protest)
काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेतील हार्बर मार्गावर ( Harbour Line Block) प्रवास ...
रावलकोटसह अनेक शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पत्रकारांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची तैनाती केली आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 नागरिक आणि दोन सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. पाकिस्तान प्रशासनाचा दावा आहे की, JAACच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले केले. मात्र, JAACने हे आरोप फेटाळून लावत, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचा दावा केला आहे.
‘मुंबई Mumbai : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत ...
संघटनेने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, "आमच्याकडे कोणतीही शस्त्रे नाहीत. साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी गोळीबार करून आमच्यावर आरोप करत आहेत," असा आरोप केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई, राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी अन्न आणि औषधांचा पुरवठा रोखल्याचाही आरोप पाकिस्तान सरकारवर केला आहे.
दरम्यान, भारताने या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दशकांपासून मूलभूत हक्कांचे उल्लंघन आणि प्रशासकीय दडपशाही सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच आंदोलकांविरोधात अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप करत, पाकिस्तानला या घटनांसाठी जबाबदार धरण्याचे आवाहनही भारताने केले आहे.






