Tuesday, July 14, 2026

Donald Trump : "आम्हीच होर्मुझचे रक्षक असल्याने आता आम्ही २०% सुरक्षा शुल्क आकारणार"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने खळबळ

Donald Trump :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा करत जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे. "आम्हीच होर्मुझच्या सामुद्रधुनीचे रक्षक आहोत. इराणशिवाय ही सामुद्रधुनी खुली राहील. इतर सर्व देशांच्या जहाजांना मुक्तपणे प्रवास करता येईल; मात्र सुरक्षेचा खर्च म्हणून प्रत्येक जहाजाच्या कार्गोच्या मूल्यावर २० टक्के शुल्क आकारले जाईल," असे ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने अनेक वर्षांपासून या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी मोठी भूमिका बजावली असून त्याचा मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यांनी इराणवर करारभंगाचा आरोप करत सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या चर्चेत जवळपास ११ तास सर्व मुद्द्यांवर एकमत झाले होते. मात्र बैठक संपल्यानंतर इराणने करारात बदल करण्याची मागणी केली. गेली ४७ वर्षे इराण हा प्रश्न प्रलंबित ठेवत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. (Donald Trump)

'होर्मुझचे रक्षक' म्हणून अमेरिकेची घोषणा :

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणविरोधातील नाकेबंदी पुन्हा लागू केली जाणार असून ती केवळ इराणी जहाजे आणि त्यांच्या ग्राहकांपुरती मर्यादित असेल. इतर सर्व देशांना समान अटींवर होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्याची मुभा असेल. अमेरिका आता स्वतःला "होर्मुझ सामुद्रधुनीची रक्षक" म्हणून घोषित करत असून, या सुरक्षेच्या बदल्यात वाहून नेल्या जाणाऱ्या सर्व मालाच्या मूल्याच्या २० टक्के रक्कम सुरक्षा शुल्क म्हणून आकारली जाईल. ही व्यवस्था तातडीने लागू करण्यात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. (Donald Trump)

इराणचा अमेरिकेला कडक इशारा :

दरम्यान, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांडने स्पष्ट इशारा देत म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात कोणताही अमेरिकन हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. इराणच्या परवानगीशिवाय या सामरिक सागरी मार्गात अमेरिकेने कोणतीही हालचाल केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. (Donald Trump)

इराणने पुढे म्हटले की, या विषयात अमेरिकेला साथ देणारा कोणताही देश इराणविरोधातील युद्धात सहभागी मानला जाईल. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत कोणतीही एकतर्फी कारवाई स्वीकारली जाणार नसून, सध्याचा तणाव युद्धात बदलल्यास त्याची जबाबदारी अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांवर असेल, असा गंभीर इशाराही तेहरानने दिला आहे. (Donald Trump)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >