Friday, July 10, 2026

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच रिव्हर्स मायग्रेशन सुरू होणार

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच रिव्हर्स मायग्रेशन सुरू होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; जहाज बांधणीसह मत्स्य-बंदर क्षेत्रात असंख्य प्रकल्प येणार

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तरुण-तरुणींना नोकरी-धंद्यासाठी मुंबई-पुण्यासह अन्य जिल्ह्यात, राज्यात किंवा परदेशात जावे लागले आहे, त्यांना पुन्हा आपल्या हक्काच्या मातीत परत आणण्यासाठी म्हणजेच जिल्ह्यात 'रिव्हर्स मायग्रेशन' सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी जनतेला दिलेला हा शब्द असून, त्याच मार्गावर चालण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले मजबूत पाऊल आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मंत्रालयात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि 'झोया मरीन' कंपनी यांच्यात पार पडलेल्या १५० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानंतर ते बोलत होते.(Nitesh Rane)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'मुंबई वॉटर मेट्रो'साठी लागणाऱ्या अत्याधुनिक बोटींची निर्मिती आता सिंधुदुर्गात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५० आणि १०० प्रवासी क्षमता असलेल्या जवळपास १०० बोटी बनवण्याचा पहिला टप्पा कंपनीला दिला गेला असून, हा भव्य कारखाना सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात उभा राहणार असल्याची माहिती नितेश राणे(Nitesh Rane) यांनी दिली. बोट क्राफ्ट, येल्लो फ्लीट यांसारख्या नामवंत कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्याचे निश्चित केले आहे. या कारखान्यामुळे जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. येथे तयार होणाऱ्या बोटी उद्या मुंबई वॉटर मेट्रोसह संपूर्ण महाराष्ट्राच्या समुद्र क्षेत्रात जलवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांनी

पुढील पाच वर्षे रोजगार निर्मितीसाठी!

"हा तर पहिला टप्पा आहे, अजून असंख्य पर्यावरणपूरक प्रकल्प जहाज बांधणी क्षेत्रात, बंदर क्षेत्रात, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रात आपल्या सिंधुदुर्गामध्ये लवकरच येत आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे आम्ही रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. याचे सकारात्मक परिणाम आमच्या सिंधुदुर्गच्या अर्थकारणावर आणि पर्यायाने कोकणावर होणार आहेत, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा