Thursday, June 25, 2026

Jalgaon : विजेच्या तारांपासून जपूनच ! विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon : विजेच्या तारांपासून जपूनच ! विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon : जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका २३ वर्षीय तरुणाचा विजेच्या सव्र्व्हस वायरचा जोरदार शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची २४ जुन रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पाचोरा शहरातील जुन्या कोर्टाजवळील हिंद ऑईलमिल रोडवरील या प्रभागाचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक दत्तात्रय जडे (Dattatray Jade) हे आपला परिवार व दोन भावांसह दोन मजली इमारतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे घराच्या काही अंतरावर विजेचा लोखंडी पोल असुन याच पोलवरुन दत्तात्रय जडे यांचे घराला विज मीटर लावण्यात आले आहे. त्यांचे घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरुन लोखंडी जिना लावण्यात आले आहे. २४ जुन रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दत्तात्रय जडे यांचा लहान मुलगा लोकेश जडे (Lokesh Jade) हा अविवाहित तरुण वरच्या मजल्यावर जात असताना विजेच्या पोलवरुन (Electric pole) आलेली सर्व्हिस वायर ही कट असल्याने लोकेश याचा त्याठिकाणी स्पर्श झाला. त्यावेळी पाऊस सुरू होता.

वायरचा लोकेश याचे डाव्या खांद्याला स्पर्श होताच लोकेश यास जोरदार विजेचा धक्का बसताच लोकेश थेट जिन्यावरुन खाली कोसळला. त्यातच लोकेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी लोकेश यांचे काका देखील जिन्याजवळ उभे असल्याने ते किरकोळ जखमी झाले. लोकेश यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात (Pachora Rural Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी लोकेश यास मृत घोषित केले. लोकेश याचे अकस्मात मृत्यूने नातेवाईकांनी घरासमोर तसेच ग्रामीण रुग्णालया समोर एकच आक्रोश केला.

विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणा

२४ जुन रोजी पाचोरा शहरात व परिसरात रिपरिप पाऊस सुरू होता. लोकेश हा जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात असतानाच विज पुरवठा करणारी सर्व्हिस वायर कट असल्याने त्याचा स्पर्श लोकेश यास झाला व त्यातच लोकेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विज वितरण कंपनीने वेळीच याची दखल घेतली असती तर लोकेश याचा जीव गेला नसता. विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लोकेश यास जीव गमवावा लागला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. तरुण वरच्या मजल्यावर जात असताना विजेच्या पोलवरुन आलेली सर्व्हिस वायर ही कट असल्याने लोकेश याचा त्याठिकाणी स्पर्श झाला. त्यावेळी पाऊस सुरू होता.

नाशिक जिल्ह्यातही दोघांनी जीव गमावला

दरम्यान नाशिकच्या दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मडकीजांब येथेही दोन दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून २२ वर्षीय भुषण गायकवाड या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यापूर्वी वणी येथेही अशी घटना दुर्दैवी घटना घडली. लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय मंडप व्यावसायिक ऋषीकेश तुकाराम मत्सागर याचाही विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू  झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >