Sunday, June 21, 2026

Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणात रॅपर सुलतान ढिल्लनचा धक्कादायक दावा ; लॉरेन्स बिश्नोईची एण्ट्री

Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणात रॅपर सुलतान ढिल्लनचा धक्कादायक दावा ; लॉरेन्स बिश्नोईची एण्ट्री

पंजाब : पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला (शुभदीप सिंग सिद्धू) याने आपल्या कलेने अनेकांच्या हृदयात घर केले होते. मानसा येथील जवाहरके गावात २९ मे २०२२ रोजी सिद्धू वर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर, गुंड गोल्डी ब्रारने हत्येची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारली. मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी, पंजाबी रॅपर सुलतानने सोशल मीडियावर अनेक धक्कादायक दावे केले ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

काय आहे दावा ?

एका इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान, सुलतानने आरोप केला की पंजाबी गायक करण औजला हा सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी जबाबदार होता. त्याने सिद्धूची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र या प्रकरणी कोणताही अधिकृत तपास झाला नाही.

करण औजला आणि दिवंगत सिद्धू मुसेवाला यांच्यातील वैर हे पंजाबी संगीत उद्योगातील सर्वाधिक गाजलेल्या वैरांपैकी एक होते. सिद्धू औजलाला लक्ष्य करत असल्याचा एक व्हिडिओ २०१७ मध्ये लीक झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली, ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. सिद्धूच्या मृत्यूनंतर, औजलाने २०२३ मध्ये 'मा' या गाण्याद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली.अनेकांना त्यांच्यातील वाद मिटला असे वाटू लागले. मात्र या प्रकरणात आता वेगळे वळण लागले आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची एण्ट्री

मुसेवालाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आणि गायकाच्या खून प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई हा कॅलिफोर्नियातील बेकर्सफील्ड येथील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये करण औजला आणि शॅरी मान यांच्यासोबत दिसला. व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. नंतर औजला आणि मान या दोघांनीही सोशल मीडियातूनच अनमोल बिश्नोईच्या उपस्थितीविषयी पूर्वकल्पना नव्हती असे स्पष्टीकरण दिले.

सध्या तरी करण औजलाने सुलतानच्या आरोपांवर सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सुलतानच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा सिद्धू मुसेवालाला कोणी मारले यावरून उलटसुलट चर्चेने जोर धरला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा