Sunday, June 21, 2026

International Yoga Day : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी योग दिनी शेअर केले खास सीक्रेट

International Yoga Day : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी योग दिनी शेअर केले खास सीक्रेट

International Yoga Day :मुंबई : १२व्या आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day) दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते अनेक केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वजण आज योगाभ्यास करताना दिसले. याशिवाय या विशेष कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगाभ्यास केला आणि तंदुरुस्त राहण्याचा संदेश दिला. यंदाच्या योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी आहे.

दरम्यान, हरियाणातील गुरुग्राम येथे १२व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही सहभाग घेतला. तिने उपस्थितांसमवेत योगाभ्यास करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. व्यासपीठावरून योगासने करत तिने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले असून सर्वांनी उत्साहाने योगाभ्यास केला. संपूर्ण वातावरण सकारात्मक आणि ऊर्जावान दिसून आले.

यावेळी अभिनेते सुनील शेट्टी आणि नील नितीन मुकेश यांनी नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. योग हा केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर मनाला शांतता आणि बळ देण्यासाठीही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. (Yoga Day)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >