नवी दिल्ली : मैत्री, नातेसंबंध आणि प्रेम याला अनेकांच्या आयुष्यात प्रचंड महत्त्व असते. काहींना ते सहज मिळते तर काहींना ते मिळवण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर करावा लागतो. अनेकदा या अॅपचा वापर काहींच्या आयुष्यात नवीन माणसं आणतो तर काहींच्या आयुष्यात नवीन संकटं. असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपवर झालेली ओळख एका महिला न्यायाधीशासाठी लाखो रुपयांच्या फसवणुकीचे कारण ठरली. या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.
घटना आताची नाही तर २०२५ ची आहे. महिला न्यायाधीशाची ओळख लोकप्रिय डेटिंग अॅपवरून एका व्यक्तीशी झाली. आरोपीने स्वतःची ओळख एका गुप्त सरकारी विभागातील अधिकारी म्हणून करून दिली होती. त्याने स्वतःचे नाव अभिमन्यू वशिष्ठ असल्याचे सांगितले. ओळख वाढत गेली आणि दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. हळूहळू ते प्रेमाच्या दिशेने वळू लागले. आरोपीने मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे.
मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी असेल. IRCTC वरून जास्तीत जास्त साठ ...
गुंतवणुकीची रक्कम तब्बल २५ लाख अधिक
महिलेने दिलेल्या माहितीनुसार महिला न्यायाधीशांनी त्यांच्याशी संबंधित बँक खात्यांमध्ये 52 लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित केली.पण या गुंतवणुकीचा त्यांना फायदा झाला नाही. अखेर ही फसवणूक असल्याची जाणीव होताच महिला न्यायाधीशाने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवले की, उपलब्ध आर्थिक व्यवहारांची पद्धत पाहता हे प्रकरण ऑनलाईन रोमान्स स्कॅम किंवा हनी ट्रॅपशी सुसंगत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई : रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या जाळ्यानंतर ...
न्यायालायने सांगितले
या प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे तपासात काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. अॅपवरील चॅट्स, संपूर्ण WhatsApp संभाषण तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपास यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, संबंधित सर्व डिजिटल पुरावे आणि व्यवहारांची संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅप्सवरील ओळख कितीही विश्वासार्ह वाटली तरी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.असे न्यायालय म्हणाले.






