Satana : सटाणा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरातील आसरा माता मंदिरासमोरील अहिल्यानगर भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कपडे वाळत टाकत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
राज्य सरकारचा निर्णय; कैद्यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार मुंबई : महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असलेली सर्वच्या सर्व ११६ दुय्यम कारागृहे ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे राहणाऱ्या सोनाली अरविंद सोनवणे या आपल्या घराच्या बाहेर गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या. यावेळी परिसरातील विजेच्या खांबावरून आलेली केबल गच्चीच्या रेलिंगला बांधलेली होती. दरम्यान, ही वायर अचानक तुटून रेलिंगच्या संपर्कात आली आणि त्यामुळे रेलिंगमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला.
कपडे वाळत टाकत असताना सोनाली सोनवणे यांचा हात त्या रेलिंगला लागला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
Nashik Crime : रिक्षामध्ये प्रवाशांची फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना अंबड पोलिसांच्या (Ambad Police) गुन्हे शोध पथकाने आणि गुंडा विरोधी पथकाने ...
१० वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला
या अचानक घडलेल्या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा त्यांच्या जवळच उपस्थित होता. सुदैवाने तो या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला असल्याचे सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विजेच्या तारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत अशा धोकादायक केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.






