भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. संजय राऊत सल्ला देत आहेत की पंतप्रधान मोदीजींनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे. पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी केदारनाथचा आदर करत असल्याने तिथे जाऊन ते आत्मचिंतनही करतात. मात्र संजय राऊत आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी केदारनाथऐवजी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मचिंतन करावे. कारण त्यांना औरंगजेबाचा उदोउदो करणे एवढेच जमते, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केली. मुंबई प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Birmingham : आगामी महिला टी-२० विश्वचषकाची १० वी आवृत्ती शुक्रवारी बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन मैदानावर यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सलामीच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून संजय राऊत आक्षेप घेत आहेत. पाच वर्षांपासून रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांनी नेमके काय दिवे लावलेत, हे एकदा महाराष्ट्राला सांगावे असे सुनावत बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व देशातील १४० कोटी जनतेने मान्य केले आहे. सातत्याने जनतेशी संपर्क, जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य समजत असल्यानेच ३७० कलम हटवण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाली. तिहेरी तलाक रद्द करण्याची हिंमत झाली. हजार वर्षांपासून प्रत्येक भारतीय हिंदू नागरिक पाहत होता, ते राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले."
Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्या नाशिककरांना सायबर भामट्यांनी मोठा दणका दिला आहे. चालू वर्षात अवघ्या ५ ...






