PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यानेही मोठी कामगिरी करत देशातील अव्वल १० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप
सौर ऊर्जा (Solar energy) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन (Atal Akshay Urja Bhavan ) येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांच्या हस्ते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. विशेष बाब म्हणजे, इतर कोणत्याही राज्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मिळाले नसल्याने महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या संकल्पनेतून फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा (PM Suryaghar Yojana ) उद्देश देशभरातील एक कोटी घरांवर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) उभारण्याचा आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध करून देण्याबरोबरच वीजबिलात मोठी बचत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत देशातील ४० लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
Nashik News : नाशिक शहरात (Nashik) सुरू असलेल्या नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान (River cleaning campaign) एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश ...
दोन वर्षांत ६ लाख सौर ऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्रात महावितरणच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत ६ लाख ५ हजार ८४७ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, या कामगिरीच्या जोरावर राज्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुजरात पहिल्या, तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.
राज्यातील जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम, अर्ज प्रक्रियेतील सुलभता आणि तांत्रिक मदतीमुळे योजनेला वेग मिळाल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक सौर प्रकल्प उभारलेल्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल तीन जिल्ह्यांनी स्थान मिळवले आहे. नागपूर जिल्हा ८९ हजार २५५ प्रकल्पांसह देशात दुसऱ्या स्थानावर, तर जळगाव जिल्हा ४२ हजार ५७४ प्रकल्पांसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यानेही ४२ हजार १५१ प्रकल्पांसह दहावे स्थान मिळवले आहे.
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता. रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी विशेष ...
महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर
दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘मंथ ऑफ सोलर’ मोहिमेतही महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली. मे महिन्यात राज्यात ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले, तर ५४ हजार २४६ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही वर्गवारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर राहिला.
विशेष म्हणजे, २९ मे रोजी एका दिवसात सर्वाधिक सौर प्रकल्प बसविण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राने ४ हजार ७०० घरांवर प्रकल्प उभारून देशात प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी आणि ४१३ अधिकृत पुरवठादारांची नोंदणी करूनही महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपली मजबूत उपस्थिती सिद्ध केली आहे.






