PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी सामना आज, ६ जून २०२६ पासून सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आर प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! विश्वनाथन आनंदांनाही जमले नाही, ते प्रज्ञानंदाने करून दाखवले! भारतीय बुद्धिबळाचा युवा तारा आर. प्रज्ञानंदाने (R ...
सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स
यशस्वी जैस्वाल बाद: मोहम्मद सलीमच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वाल २४ धावा करून बाद झाला आहे.
के.एल. राहुलला जीवदान: झिआऊर रहमानच्या गोलंदाजीवर के.एल. राहुलला जीवदान मिळाले. पंचांनी सुरुवातीला नाबाद ठरवले, परंतु रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसून आले, मात्र अफगाणिस्तानने रिव्ह्यू घेण्याची संधी गमावली.
पदार्पण: भारताच्या मानव सुथार आणि अफगाणिस्तानच्या नागेलिया खरोटे यांनी या कसोटी सामन्यातून पदार्पण केले आहे.
दोन्ही संघ
भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.
अफगाणिस्तान संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), सेदिक्वाल अटल, रहमनुल्ला गुरबाझ, अब्दुल मलिक, रहमत शहा, अफसर झाझाई, अझमतुल्ला ओमरझाई, शर्फुद्दीन अशरफ, नागेलिया खरोटे, झिआऊर रहमान, मोहम्मद सलीम.





