- आर प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! विश्वनाथन आनंदांनाही जमले नाही, ते प्रज्ञानंदाने करून दाखवले!
भारतीय बुद्धिबळाचा युवा तारा आर. प्रज्ञानंदाने (R Praggnanandhaa) जागतिक बुद्धिबळ विश्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नॉर्वे चेस २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत त्याने इतिहास रचला असून, या प्रतिष्ठित स्पर्धेचा किताब जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा पराभव करत प्रज्ञानंदाने हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी प्रज्ञानंदा (R Praggnanandhaa) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक क्षणी त्याने आपल्या अनुभव, संयम आणि आक्रमक खेळीचे शानदार प्रदर्शन करत पारंपरिक सामन्यात विजय मिळवला. या विजयामुळे त्याच्या खात्यात तीन महत्त्वाचे गुण जमा झाले आणि तो १८ गुणांसह थेट अव्वल स्थानावर पोहोचला. (R Praggnanandhaa)
इंडिया ए (India A Cricket Team), श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए यांच्यात होणाऱ्या वनडे ट्राय सीरिजला ९ जूनपासून सुरुवात होत आहे. या ...
या यशामागे प्रज्ञानंदाची (R Praggnanandhaa) सातत्यपूर्ण कामगिरी आणि धाडसी खेळ निर्णायक ठरला. विशेष म्हणजे, त्याने स्पर्धेदरम्यान जगातील अव्वल बुद्धिबळपटू आणि नॉर्वेचा स्टार खेळाडू मॅग्नस कार्लसनला तब्बल दोन वेळा पराभूत केले. कार्लसनच्या कारकिर्दीत एका स्पर्धेत त्याला दोनदा हरवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये आता प्रज्ञानंदाचाही समावेश झाला आहे. या विजयांनीच त्याच्या विजेतेपदाचा पाया भक्कम केला.
स्पर्धेच्या सुरुवातीला प्रज्ञानंदाची (R Praggnanandhaa) कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. काही फेऱ्यांनंतर तो विजेतेपदाच्या शर्यतीत मागे पडल्याचे दिसत होते. मात्र त्याने हार न मानता दमदार पुनरागमन केले. सलग चार पारंपरिक सामने जिंकत त्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि अखेर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
NEW DELHI : आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि युगांडा या देशांमध्ये इबोला विषाणूच्या (बुंडीबुग्यो स्ट्रेन) वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक ...
गेल्या काही वर्षांत भारतीय युवा बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. विश्वविजेता डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी आणि प्रज्ञानंदा यांच्यासारखे खेळाडू सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. प्रज्ञानंदाच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय बुद्धिबळाचे वाढते वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. (R Praggnanandhaa)




