Saturday, June 6, 2026

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघांची घोषणा केली आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे सोपविण्यात आले असून तिलक वर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवड समितीने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत दोन्ही स्पर्धांसाठी मजबूत संघ निवडला आहे. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी याला राष्ट्रीय संघात संधी देण्यात आली असून, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार) तिलक वर्मा (उपकर्णधार) अभिषेक शर्मा नितीश कुमार रेड्डी संजू सॅमसन (यष्टीरक्षक) इशान किशन (यष्टीरक्षक) शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती रवि बिश्नोई जसप्रीत बुमराह हर्षित राणा अर्शदीप सिंग वैभव सूर्यवंशी

इंग्लंड दौरा 2026 (टी-20 मालिका) साठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार) तिलक वर्मा (उपकर्णधार) अभिषेक शर्मा नितीश कुमार रेड्डी संजू सॅमसन (यष्टीरक्षक) इशान किशन (यष्टीरक्षक) शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती रवि बिश्नोई मोहम्मद सिराज हर्षित राणा अर्शदीप सिंग प्रिन्स यादव वैभव सूर्यवंशी नव्या युगाची सुरुवात

श्रेयस अय्यरला टी-20 संघाचे नेतृत्व देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात मानला जात आहे. त्याचबरोबर तिलक वर्माला उपकर्णधारपद देऊन भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

भारताची नजर दुहेरी यशावर

जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका विजय हे भारतीय संघाचे प्रमुख लक्ष्य असेल. युवा खेळाडू आणि अनुभवी स्टार्सच्या मिश्रणामुळे भारतीय संघ दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >