पुणे : कोथरूड येथे झालेल्या गोळीबार (firing) प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घायवळ टोळीविरोधात (gang) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई (action) केली आहे. टोळीचा ‘ब्रेन’ म्हणून ओळखला जाणारा सचिन घायवळ याला पुणे गुन्हे शाखेने (Crime Branch) राजस्थानमधील सीकर येथून अटक (arrest) केली आहे. तब्बल ९ महिन्यांपासून फरार (absconding) असलेल्या सचिन घायवळचा शोध अखेर एका फोन कॉलमुळे (phone call) लागला.
कोथरूडमधील जीवघेणा हल्ला (deadly attack) आणि गोळीबार (firing) प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी घायवळ टोळीचे जाळे उद्ध्वस्त (dismantle) करण्याचा निर्धार केला होता. या कारवाईदरम्यान कुख्यात निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर (radar) आला. त्याचबरोबर टोळीचा प्रमुख रणनीतीकार (mastermind) मानला जाणारा सचिन घायवळही पोलिसांच्या लक्ष्यावर (target) होता.
पाटणा : प्रसिद्ध शिक्षक खान सर पुन्हा एकदा वादाच्या (Controversy) भोवऱ्यात सापडले आहेत. पाटणा येथील त्यांच्या कोचिंग सेंटरबाहेर झालेल्या गोळीबार (Firing) ...
सचिन घायवळ गेल्या ९ महिन्यांपासून फरार होता. पोलिसांची दिशाभूल (mislead) करण्यासाठी त्याने दाढी वाढवून स्वतःची ओळख (identity) बदलली होती. राजस्थानमधील सीकर येथे एका छोट्या खोलीत राहून तो लपून बसला होता. एवढेच नव्हे तर त्याने कुटुंबीयांशी सर्व संपर्क (contact) तोडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने एका नातेवाईकाला फोन कॉल (phone call) केला आणि हाच कॉल त्याच्यासाठी अडचणीचा ठरला.
पुणे गुन्हे शाखेने तांत्रिक तपास (technical investigation) आणि मोबाईल लोकेशन (mobile location) यांच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांचे पथक (team) सीकरमध्ये दाखल झाले. सुरुवातीला सचिन घायवळने पोलिसांना गुंगारा (escape attempt) देण्याचा प्रयत्न केला. मात्र सिनेस्टाईल (cinestyle) पाठलागानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
मुंबई (IndiGo Flight News) : देशातील आघाडीची एअरलाइन (Airline) IndiGo ने आपल्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये (International Flights) तात्पुरती कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सचिन घायवळचा गुन्हेगारी इतिहास (criminal history)
* २०१० ते २०१५ : खुनाचा प्रयत्न (attempt to murder), प्रतिस्पर्धी टोळीवर हल्ले (gang attacks) आणि निलेश घायवळ टोळीच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग. * २०१४ : पप्पू ऊर्फ सचिन कुडले खून (murder) प्रकरणात तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी; पोलिसांकडून मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई. * २०१४ ते २०१५ : बेकायदेशीर शस्त्र (illegal weapon) बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल. * २०१४ ते २०२४ : खंडणी (extortion), मारहाण (assault), टोळीयुद्ध (gang war) तसेच विरोधी टोळीतील दोघांच्या खुनांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग. * २०१५ : टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी तडीपार (externment). * २०१९ : खून प्रकरणात पुराव्याअभावी मुक्तता (acquittal); या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) अपील दाखल.
कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking) प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने ...
सचिन घायवळ हा केवळ गुन्हेगारी विश्वातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही (political circle) चर्चेचा विषय ठरला होता. कर्जत-जामखेड परिसरातील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांशी (political leaders) त्याचे निकटचे संबंध असल्याची चर्चा होती. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी (criminal background) असतानाही तो जिल्हा परिषद निवडणूक (Zilla Parishad election) लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती.
याशिवाय, सचिन घायवळला शस्त्र परवाना (arms licence) देण्यात आल्याच्या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद (controversy) निर्माण झाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना कसा देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी गृहमंत्र्यांवर (Home Minister) गंभीर आरोप केले होते.






