Sunday, May 17, 2026

EBOLA ALERT : जागतिक आरोग्य संघटनेने जगभर जाहीर केला ईबोला अलर्ट

EBOLA ALERT : जागतिक आरोग्य संघटनेने जगभर जाहीर केला ईबोला अलर्ट

काँगो : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत ईबोला विषाणूमुळे ८८ मृत्यू झाले आहेत. धोकादायक इबोला विषाणूची बाधा झालेले नवे ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जगभर ईबोला अलर्ट जाहीर केला आहे. इबोला ही एक आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी रविवार १७ मे २०२६ रोजी काँगो आणि युगांडामधील इबोलाचा प्रादुर्भाव 'जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केला. बुंदीबुग्यो विषाणूमुळे होणारा उद्रेक म्हणजे कोविड-१९ प्रमाणे जागतिक महामारी नाही. पण खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. एवढ्यात कोणत्याही देशाने इतरांसाठी आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यासारखी परिस्थिती झालेली नाही. पण खबरदारी घेतली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.

इबोला संकटाची नेमकी आकडेवारी पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. या आकडेवारीवरून संकटाची तीव्रता समजेल. पण वेळीच खबरदारी घेतल्याचे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही; असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.

इबोला झालेल्या रुग्णाच्या लाळ, उलटी, रक्त किंवा वीर्याच्या संपर्कात आल्यामुळे इतरांना हा आजार होण्याचा धोका वाढतो. हा आजार गंभीर आणि अनेकदा प्राणघातक असतो. सध्याचा उद्रेक हा इबोलाचा एक दुर्मिळ प्रकार असलेल्या बुंदीबुग्यो विषाणूमुळे झाला आहे . सध्या यावर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. काँगो आणि युगांडाने इबोलाच्या २० हून अधिक लाटा (वेव्ह्ज) अनुभवल्या आहेत. बुंदीबुग्यो विषाणूचा हा काँगो आणि युगांडातील तिसरा उद्रेक आहे. आतापर्यंत युगांडात दोन आणि इतर सर्व प्रकरणे कांगोत आढळली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

इबोलाची प्रमुख लक्षणे : ताप, थंडी ताप, असह्य डोकेदुखी, असह्य अंगदुखी, अती थकवा, प्रचंड अशक्तपणा, त्वचेवर पुरळ किंवा चट्टे येणे, भूक न लागणे, घसादुखी, पोट बिघडणे, सतत उलट्या होणे, जुलाब होणे (अतिसार), त्वचेवर काळे-निळे डाग पडणे, त्वचेवरील जखमांतून अती रक्तस्राव होणे, डोळे अती लाल होणे

Comments
Add Comment