काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील सागरी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. १४-१५ जुलैच्या रात्री युक्रेनने क्रिमियाजवळ रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’मधील २० जहाजांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये १७ तेलवाहू जहाजे, दोन गॅस जहाजे आणि एका टगबोटीचा समावेश होता. या हल्ल्यांनंतर रशियाने अझोव्ह समुद्रातील जहाजांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. युक्रेनकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाला अझोव समुद्रातील काही महत्त्वाच्या जलमार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करावी लागली आहे. यामुळे रशियाचा व्यापार, लष्करी पुरवठा आणि जागतिक निर्यात व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता वाढली आहे. (Ukraine - Russia War)
युक्रेनच्या ड्रोन दलाचे कमांडर रॉबर्ट ब्रोव्हडी यांनी दावा केला आहे की, गेल्या नऊ दिवसांत युक्रेनने अझोव समुद्र परिसरातील ११६ रशियन जहाजांना लक्ष्य केले आहे. या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसली तरी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या काही व्हिडिओंमध्ये सागरी लक्ष्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. (Ukraine - Russia War)
सततच्या हल्ल्यांनंतर रशियाला दोन महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाहतूक थांबवावी लागली आहे. यामध्ये डॉन-अझोव कालव्याचा समावेश आहे, जो अझोव समुद्राला रशियाच्या अंतर्गत जलमार्गांशी जोडतो. दुसरा मार्ग म्हणजे केर्च सामुद्रधुनी, जी अझोव समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणारा प्रमुख संपर्क मार्ग आहे. उपग्रह छायाचित्रे आणि जहाज वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांच्या माहितीनुसार, या मार्गांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने जहाजे अडकून पडली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी सागरी व्यापारावर परिणाम झाला असून अनेक जहाजांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास विलंब होत आहे. (Ukraine - Russia War)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी ...
अझोव समुद्र हा रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी प्रदेश मानला जातो. केर्च सामुद्रधुनीद्वारे तो काळ्या समुद्राशी जोडलेला असून दक्षिण रशियातील अनेक प्रमुख बंदरांना जागतिक सागरी व्यापार मार्गांशी जोडतो. दीर्घकाळ हा भाग रशियासाठी सुरक्षित मानला जात होता, मात्र युक्रेनच्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. (Ukraine - Russia War)
तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम केवळ तेल वाहतुकीपुरता मर्यादित राहणार नाही. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या गहू निर्यातदारांपैकी एक असून जागतिक गहू निर्यातीत त्याचा सुमारे २० टक्के वाटा आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, रशियाच्या गहू निर्यातीचा मोठा भाग याच प्रदेशातून होतो. काळ्या समुद्राचे कृषी बाजाराचे तज्ज्ञ आंद्रेई सिझोव्ह यांच्या मते, रशियाच्या एकूण गहू निर्यातीपैकी सुमारे एक चतुर्थांश निर्यात अझोव समुद्र मार्गे केली जाते. त्यांचे म्हणणे आहे की, सध्याची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास रशियाला अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
युक्रेनचे म्हणणे आहे की, त्यांच्या हल्ल्यांचा उद्देश रशियाची लष्करी रसद व्यवस्था आणि कब्ज्यातील प्रदेशांपर्यंत पोहोचणारे पुरवठा मार्ग कमकुवत करणे हा आहे. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, क्रिमिया आणि दक्षिण युक्रेनमधील रशियन लष्करी तळांकडे जाणाऱ्या पुरवठा साखळीला लक्ष्य केले जात आहे. (Ukraine - Russia War)
युक्रेनच्या ‘४१३व्या स्वतंत्र मानवरहित प्रणाली रेजिमेंट’चे कमांडर मेजर इव्हेन करास यांनी सांगितले की, रशियाने क्रिमियाचे रूपांतर एका मोठ्या लष्करी केंद्रात केले आहे आणि तेथे पोहोचणाऱ्या लष्करी साहित्याच्या सर्व मार्गांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा युक्रेन प्रयत्न करत आहे.
मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra - SIR) अभियानाला महाराष्ट्रात १० दिवसांची मुदतवाढ ...
दुसरीकडे, रशियाने या हल्ल्यांना दहशतवादी कारवाया असे संबोधले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे की, अझोव समुद्रातील युक्रेनच्या कारवाया समुद्री चाचेगिरीच्याही पुढे गेल्या असून त्यांचा उद्देश केवळ नुकसान करणे आणि भीती निर्माण करणे हा आहे. युक्रेनने हे आरोप फेटाळून लावत आपण केवळ लष्करी आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या लक्ष्यांवरच हल्ले करत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान युक्रेनवर रशियाचे सलग पाचव्या दिवशीही हल्ले सुरूच आहेत. बुधवारी रशियाने ओडेसा आणि आसपासच्या बंदरांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले केले. ओडेसातील सात मजली निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. (Ukraine - Russia War)
अझोव समुद्रावरील संघर्ष काही नवीन नाही. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा केल्यानंतर या प्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये सातत्याने तणाव निर्माण झाला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने व्यापक लष्करी मोहिम सुरू केल्यानंतर अझोव समुद्रालगतच्या युक्रेनच्या बहुतांश किनारी भागांवर रशियाचे नियंत्रण प्रस्थापित झाले. त्यानंतर रशियाने या सागरी प्रदेशाचा स्वतःच्या प्रभावक्षेत्राप्रमाणे वापर सुरू केला. (Ukraine - Russia War)
मात्र आता युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे आणि वाढत्या सागरी क्षमतांमुळे या भागातील रशियाच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे अभियान दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचा परिणाम केवळ युद्धापुरता मर्यादित राहणार नाही, तर जागतिक अन्नपुरवठा, ऊर्जा बाजारपेठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही होऊ शकतो. (Ukraine - Russia War)






