मुंबई : जागतिक इंधन संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या 'काटकसरी'च्या मंत्राची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुरू केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री चक्क 'रॉयल एनफिल्ड ३५०' या दुचाकीवरून (बुलेट) विधानभवनात दाखल झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरक्षित ताफ्यातील आलिशान गाड्यांना फाटा देत थेट बुलेटवरून एन्ट्री केल्याने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये त्याची मोठी चर्चा रंगली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पाचे ...
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हेदेखील दुचाकीवरून मुख्यमंत्र्यांसोबत विधानभवनात पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अंगरक्षक आणि पोलिसांचा ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट परिधान करून आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करत हा प्रवास पूर्ण केला.
साधेपणातून सकारात्मक संदेश





