अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि आनंदाचा उत्सव येतोच, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी या सगळ्याला बगल देत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. भांदिर्गे यांनी मुंबईतील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अवयवदानासाठी अधिकृत नोंदणी करून मृत्यूनंतरही इतरांना जीवन देण्याचा संकल्प करत एकप्रकारे अवयव दानासाठी पुढाकार घेतला. तसेच या अवयव दानाच्या चळवळीची आपल्यापासून सुरुवात केली.
नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या ...
या उपक्रमामुळे नायर रुग्णालयाच्या इतिहासात एक महत्त्वाची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष या नात्याने अवयवदानासाठी अधिकृत अर्ज करणारे हरिष भांदिर्गे हे पहिले व्यक्ती ठरले आहेत. "वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे. माझ्यानंतर माझ्या अवयवांमुळे एखाद्याला नवजीवन मिळणार असेल, तर त्यापेक्षा मोठे भाग्य आणि समाधान दुसरे असू शकत नाही.,असे भांदिर्गे यांनी स्पष्ट
दिल्ली : दिल्लीत नेमकं चालंय तरी काय? गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या ...
आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. आज देशभरात हजारो रुग्ण हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि इतर अवयवांच्या प्रतीक्षेत जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीचे अवयवदान अनेकांना नवजीवन देऊ शकते, हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
"मृत्यूनंतर शरीर संपते, पण आपल्या अवयवांमधून अनेकांचे आयुष्य पुन्हा फुलू शकते. आपण या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या अस्तित्वाचा एक भाग कोणाच्या तरी श्वासात, हृदयाच्या ठोक्यात किंवा डोळ्यांतील प्रकाशात जिवंत राहू शकतो. यापेक्षा मोठे दान आणि मानवतेची सेवा कोणती?" असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले.
समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त केलेला हा संकल्प केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजात अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेंद्र मोहिते यांच्यासह नायर रुग्णालयातील सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि सहकारी वर्ग उपस्थित होता.






