Wednesday, May 13, 2026

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील 'सर्वोदय सहकारी बँके'चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे असलेले अपुरे भांडवल, उत्पन्नाची घटलेली साधने आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आलेले अपयश यावर ठपका ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार बुधवारपासून तातडीने बंद झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोदय सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली असून भविष्यात उत्पन्नाची कोणतीही शाश्वती उरलेली नाही. बँक आपल्या ठेवीदारांची देणी पूर्णपणे भागवण्यास असमर्थ असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. "अशा स्थितीत बँकेचे कामकाज पुढे चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या हितासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी अत्यंत हानिकारक ठरेल," असा निष्कर्ष नोंदवत आरबीआयने परवाना रद्द केला आहे. बँकिंग व्यवहारांवर तात्काळ बंदी
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा