Wednesday, May 13, 2026

BMC News : माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा तातडीने पुरवा ; स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

BMC News : माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा तातडीने पुरवा ; स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे माहुल येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु या वसाहतींमध्ये केवळ उदवाहनची समस्या नाही तर तेथील पायाभूत सेवा सुविधांचाही मोठ्याप्रमाणात अभाव आहे. त्यामुळे या वसाहतीमध्ये अशा सुविधा नसणे हे महापालिकेसाठी भुषणावह नसून या वसाहतीमध्ये तातडीने सर्वप्रकारच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी अशाप्रकारचे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांनी दिले.

एम पश्चि विभागातील चेंबूर माहुल गाव येथील एसआरए कॉलनीमधील स्विंग दरवाजे असलेल्या तळ अधिक आठ मजल्याच्या इमारतीच्या वार्षिक देखभालीच्या कंत्राट स्थायी समितीच्या सभेत आल्यानंतर हा प्रस्तावाच्या अनुषंगाने या विभागाची पाहणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांसह केली होती. या पाहणी दौऱ्यानंतर हा याबाबतचा प्रस्तावाला मंजुरी देताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तेथील प्रश्न हा लिफ्ट पुरताच मर्यादीत नाही तर तेथील परिस्थती ही मानवी वस्तीला साजेशी नाही. तेथील नागरिक अशाप्रकारच्या वातावरणात तिथे राहतात, हे योग्य नाही. त्याठिकाणी पायाभूत सुविधांचाच पत्ता नाही. त्यामुळे त्याठिकाणी तातडीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश देतानाच याठिकाणी अनेक ठिकाणचे नागरिक राहायला गेलेले असून त्यामुळे त्यांना योग्यप्रकारे पायाभूत सुविधा मिळतील याकडे जातीने लक्ष दिला जावा असेही निर्देश दिले.

Comments
Add Comment