कर्नाटक : कन्नड सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते दिलीप राज (Dileep Raj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कन्नड मनोरंजनविश्व हादरले असून चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दिलीप राज (Dileep Raj) यांनी कन्नड चित्रपटसृष्टीसोबतच कन्नड टेलिव्हिजन क्षेत्रातही मोठं योगदान दिलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘बॉयफ्रेंड’ (Boyfriend) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘लव्ह मॉकटेल ३’ (Love Mocktail 3), ‘मिलाना’ (Milana), ‘टोनी’ (Tony), ‘ऑर्केस्ट्रा म्हैसूर’ (Orchestra Mysuru), ‘यू टर्न’ (U Turn), ‘मींचगी नी बारालू’ (Minchagi Nee Baralu) आणि ‘हिटलर कल्याण’ (Hitler Kalyana) यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
रवी शंकर यांनी पुढे दिलीप राज यांच्या संघर्षमय आयुष्याबद्दल सांगताना म्हटलं की, “एक काळ असा होता की त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. घरखर्च भागवण्यासाठी त्यांना स्वतःची महागडी घड्याळं आणि परफ्यूम विकावे लागले होते.” या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये अधिक हळहळ व्यक्त केली जात आहे.
कल्याण : कल्याणमधील सांस्कृतिक ओळख मानल्या जाणाऱ्या आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकप्रिय ...
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दिलीप राज (Dileep Raj) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधत बुधवारी सकाळची अपॉइंटमेंटही घेतली होती. मात्र सकाळ होण्याआधीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.





