सोमनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. सोमनाथ मंदिर पुनरुज्जीवनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा गौरव केला. यावेळी त्यांनी १९९८ च्या पोखरण अणुचाचणीचा संदर्भ देत भारताच्या सामर्थ्याचे आणि स्वाभिमानाचे जोरदार समर्थन केले.
हमारे सांस्कृतिक स्थल हजारों वर्षों से भारत की पहचान रहे हैं। लेकिन दुर्भाग्य से देश में आज भी ऐसे लोग हैं, जिनके लिए सोमनाथ जैसे राष्ट्रीय स्वाभिमान के विषय से ज्यादा जरूरी तुष्टिकरण है। pic.twitter.com/5nkVL6lWrO
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
पंतप्रधानांनी सांगितले की, ११ मे हा दिवस केवळ सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेचाच नाही, तर भारताच्या अणुचाचणीचाही ऐतिहासिक साक्षीदार आहे. "१९९८ मध्ये जगातील मोठ्या शक्तींनी भारतावर निर्बंध लावून आपल्याला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. दबाव इतका होता की इतर कोणताही देश झुकला असता, पण अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने नमण्यास नकार दिला. ११ मे नंतर १३ मे रोजी पुन्हा दोन चाचण्या करून भारताने आपली अढळ राजकीय इच्छाशक्ती जगाला दाखवून दिली," असे मोदी म्हणाले. "१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण १९५१ मध्ये सोमनाथच्या प्राणप्रतिष्ठेने भारताच्या मुक्त जाणीवेची घोषणा केली," असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मते, सोमनाथ मंदिर हे केवळ इतिहासाचे प्रतीक नसून पुढील हजार वर्षांसाठी प्रेरणेचा उत्सव आहे.
वर्ष 1998 में पोखरण में परमाणु परीक्षण के साथ दुनिया ने भारत के वैज्ञानिकों के सामर्थ्य को महसूस किया। इसके बाद देश ने हर तरह के संकट का जिस मजबूती से मुकाबला किया, उससे दुनिया भी हैरान रह गई। pic.twitter.com/l4FYmAr5Kp
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार : पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले, पण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला विरोध केला होता. "अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला ज्या मानसिकतेने विरोध केला, तीच 'तुष्टीकरणाचे राजकारण' करणारी शक्ती आजही सक्रिय आहे. आपल्याला अशा संकुचित राजकारणापासून सावध राहावे लागेल," असा इशारा त्यांनी दिला.
कोलकाता : पश्चिम बंगालमार्गे भारतामध्ये बिनबोभाट घुसखोरी अनेक वर्षे सुरू होती. पण भाजपच्या नेतृत्वात सरकार येताच पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने एक ...
वारसा आणि आधुनिकतेचा संगम : पंतप्रधानांच्या मते, भारतासाठी वारसा आणि आधुनिकता हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. "सांस्कृतिक केंद्रांच्या दुर्लक्षामुळेच भारताच्या प्रगतीत अडथळे आले होते, जे आता दूर केले जात आहेत," असे त्यांनी नमूद केले. या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले.
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढत्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटत असताना, भारत सरकारने संभाव्य धोके ओळखून अत्यंत सावधगिरीची ...
सोहळ्यातील विशेष क्षण : महापूजा: कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात 'महापूजा' केली. भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाच्या भव्य कळसाला ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला.
रोड शो : हेलिपॅडपासून वीर हमीरजी सर्कलपर्यंत सुमारे १.५ किमीचा भव्य रोड शो काढण्यात आला. हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले.




