Monday, May 11, 2026

Nashik : निदा खानच्या अडचणी वाढल्या ; ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nashik  : निदा खानच्या अडचणी वाढल्या ; ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nashik : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासात मुख्य संशयित निदा एजाज खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज (सोमवारी) निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा खानला नाशिकरोड येथील न्यायालयात (Nashik Road Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होणार आहे.

दरम्यान, एसआटीच्या तपासात निदा खान बाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासासाठी निदा खानचा मोबाईल जप्त करण्यात आला असून या मोबाईल मधून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. निदाने पीडितेच्या मोबाईलवर तब्बल १७१ वादग्रस्त लिंक्स पाठवल्या होत्या. या लिंक्सच्या माध्यमातून पीडितेच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल न्यूनगंड निर्माण करणे आणि विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र राबवण्यात आले होते. या डिजिटल पुराव्यांमुळे धर्मांतरासाठी वापरले जाणारे हे नवे ‘मॉडेल’ आता समोर आले आहे.

दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे या गुन्ह्यातील मुख्य संशयित आहे, या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांत आणखी वाढ केली आहे.

दरम्यान, निदा खान (Nida Khan) 40 दिवसांपासून फरार होती, पोलिसांची अनेक पथकं तिचा शोध घेत होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला होता. निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला (Nida Khan) ठेवण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >