Friday, May 8, 2026

SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर , दहावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?

SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर , दहावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?

SSC Exam Result 2026 : आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे, बोर्डाकडून दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार होता, मात्र एकाच वेळी साईटवरती वाढणार ट्रॅफिक यामुळे ११.३० वाजल्यापासून निकाल वेबसाईटवरती जाहीर करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे, तर मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारीही यंदा जास्त चांगली आहे.या वर्षी 92.9 टक्के निकाल (SSC Exam Result 2026) लागला आहे. जेवढ्या मुली परिक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 94.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्याबाबत ती 89.56 टक्के आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. १० वीच्या निकालात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर असून कोकण विभागाचा निकाल (९७.६२%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ %) आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले ऄसून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची एकूण ऊत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ अहे.

SSC Exam Result 2026: नाशिक विभाग पाचव्या स्थानावर

आज शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागाने ९०.५३ टक्के निकालासह राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. नाशिक विभागातून एकूण २०१९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०००९६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १८११५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ६४००७ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ६६४०३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १०,२१८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे.

SSC Exam Result 2026: दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

SSC Exam Result 2026: विभागनिहाय आकडेवारी समोर

कोकण: ९७.६२ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६

उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >