मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake) मंगळवारी (७ जुलै) रात्री ११.४३ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. यापूर्वी त्याच दिवशी रात्री ९ वाजता विहार तलावही भरून वाहू लागला होता. (Vihar Lake)
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी हा सर्वात लहान तलाव आहे. या तलावाची उपयुक्त जलसाठा क्षमता ८०४.६ कोटी लिटर (८०४६ दशलक्ष लिटर) असून येथून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. (Mumbai Water Supply)
पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाले ...
गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाचे अतिरिक्त पाणी पुढे विहार तलावात जाऊन मिळते.(Tulsi Lake Overflow)
- मृत्यूवर हसलो नाही, दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओची चौकशी करा मुंबई : विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना, अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल ...
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सात तलावांमधील एकूण पाणीसाठा सध्या एकूण क्षमतेच्या ४१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सन १८७९ मध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या खर्चातून तुळशी तलावाची उभारणी करण्यात आली होती. हा तलाव बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असून त्याचे पाणलोट क्षेत्र ६.७६ चौरस किलोमीटर आहे. (Water Stock Mumbai)





