Wednesday, May 6, 2026

USA Attack on Iran : इराणच्या सात नौका नष्ट केल्या, अमेरिकेने दिली माहिती

USA Attack on Iran : इराणच्या सात नौका नष्ट केल्या, अमेरिकेने दिली माहिती

वॉशिंग्टन : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या सात “फास्ट बोट्स” (वेगवान बोटी) नष्ट केल्या आहेत. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही सात लहान बोटी किंवा ज्याला ते ‘फास्ट’ बोट्स म्हणतात, त्या बुडवल्या आहेत. त्यांच्याकडे आता एवढेच शिल्लक आहे. तर अमेरिकन लष्कराने सांगितले की या हल्ल्यांसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. इराणने मात्र असा कोणताही हल्ला झाल्याचा इन्कार केला आहे.

ट्रम्प म्हणाले, अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना मदत करत आहे. यापूर्वी अमेरिकेने म्हटले होते की त्यांच्या नौदलाच्या जहाजांनी सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे, परंतु इराणने हा दावा फेटाळून लावला. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी अमेरिकेच्या युद्धनौकेवर इशारा देणारे गोळीबार केले होते, मात्र, वॉशिंग्टनने हे वृत्त फेटाळले आहे. तर यूएईने म्हटले आहे की त्यांच्या सरकारी तेल कंपनीशी संबंधित एका टँकरला सामुद्रधुनीत धडक देण्यात आली. दक्षिण कोरियानेदेखील जवळच असलेल्या त्यांच्या एका जहाजावर स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. यूएईच्या अधिकाऱ्यांनी हवाई संरक्षण दलाने १२ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, तीन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि चार ड्रोन लक्ष्य केल्याचे म्हटले. तर अबू धाबीने या हल्ल्यांना धोकादायक वाढ म्हटले असून प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा