Thursday, April 30, 2026

Fraud Alert At Andheri Station : धक्कादायक! अंधेरी रेल्वे स्टेशनवर अज्ञात महिलेकडून फसवणुकीचा प्रकार

Fraud Alert At Andheri Station : धक्कादायक! अंधेरी रेल्वे स्टेशनवर अज्ञात महिलेकडून फसवणुकीचा प्रकार

- खोटी कारणे सांगून अनेक प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमधून एक माणूस स्टेशनवर होणाऱ्या फ्रॉड बद्दल लोकांना सावध करताना दिसत आहे.

नेमका प्रकार काय ?

अंधेरी स्टेशनवर एका अज्ञात महिलेने आपले पैसे चोरीला गेल्याचे सांगत तिकीट काढण्यासाठी मदतीच्या नावाखाली अनेक प्रवाशांकडे पैशांची मागणी केल्याचे दिसून आले. मात्र, काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आले की ती महिला एकच गोष्ट सर्व प्रवाशांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळते आहे. त्यामुळे त्या महिलेचे पैसे चोरीला गेले नसून ती खोटं बोलून १० - २० रुपये किंवा ५० असे लोकांकडून पैसे उकळते आहे. ही एक फसवणूक आहे, हा एक मोठा स्कॅम आहे. आणि तुम्ही या अशा स्कॅमची शिकार होऊ नका. असा सावध करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या घटनेचा उद्देश कोणाला कमी लेखणे नसून, नागरिकांना सतर्क करणे असा आहे. मोठी किंवा छोटी रक्कम यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या घटनांमुळे कामगार आणि प्रवाशांचे कष्टाचे पैसे चुकीच्या हातात जाण्याची शक्यता असते.

गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांनी कोणालाही मदत करताना थोडी चौकशी करणे आणि खात्री करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे.

रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करताना सतर्क राहणे, संशयास्पद वागणूक दिसल्यास रेल्वे सुरक्षा दल किंवा पोलिसांना माहिती देणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे.

अंधेरी स्टेशनवरील या घटनेतून एकच संदेश मिळतो की “प्रत्येक गोष्ट ऐकून लगेच विश्वास ठेवू नका, सतर्क रहा आणि आपले कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >