पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत असून कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावरील प्रमुख निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाने ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडनेही १०४ डॉलरचा स्तर पार केला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज म्हणजेच गुरुवार ३० एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी ...
फ्युचर्स बाजारातही तेजीचा कल कायम असून जून महिन्यासाठी ब्रेंट फ्युचर्स ११.२६ डॉलरवर बंद झाले, तर डब्ल्यूटीआय फ्युचर्स ९९.९३ डॉलरपर्यंत पोहोचले. सलग सात दिवस ब्रेंटमध्ये वाढ नोंदली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतील विलंब आणि होर्मुज सामुद्रधुनीत वाढती नाकेबंदी यामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा या मार्गे होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Crude Oil Prices)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात सुरू असलेल्या अमेरिकन नौदल नाकेबंदीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या कारवाईला ...
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती (Crude Oil Prices) वाढूनही देशातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत असून त्यांचे नुकसानही वाढत असल्याचे चित्र आहे.






