Sunday, April 19, 2026

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी शिगांनी भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चार वाहनांना धडक देऊन महामार्गाजवळ विहिरीत कोसळला.

या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा