 |
दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल
मेष : मालमत्ता जमीन जुमला याविषयीची दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल चांगल्या बातम्या मिळतील सरकारी महत्त्वाची कामे विनाविलंब होण्याची शक्यता अडचणी दूर होतील .नोकरीमध्ये प्रगतीच्या दृष्टीकोनातून अनुकूल कालावधी. उन्नती, प्रगती होईल. वरिष्ठ आपल्या कामावरती खूश राहतील आपल्या कामाची प्रशंसा होईल कौतुकास पात्र ठराल.जर नोकरीत बदल करायचा असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे प्रयत्नांना यश मिळेल ओळखीचे फायदे होतील. समाजातील मान्यवरांकडून मदत तसेच सहकार्य मिळू शकते कोणतीही लहान मोठी आर्थिक कामे सावधानतेने करण्याची गरज. कोणाच्या ही गोड बोलण्याला फसवू नका. तसेच आपली महत्त्वाची कागदपत्रे व मौल्यवान वस्तू, वाहने सुरक्षित जागी ठेवा.
|
 |
आर्थिक आवक उत्तम
वृषभ : मनोरंजन तसेच मौजमजे कडे कल राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय राहाल. जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकाल खर्च वाढेल स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी होईल प्रवासात काळजी घ्या वाहने जपून चालवा जीवनसाथी आपल्या मनासारखे वागेल नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील सहकार्यांचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. कुटुंब परिवारातील वातावरण सुखद राहील निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे योग आहेत आर्थिक आवक उत्तम राहील स्वतःचा छंद कला वाढविण्यासाठी वेळ मिळेल चांगल्या पुस्तकांचे वाचन होईल. हितचिंतकांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील चिंता मिटतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते परंतु वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल त्याचप्रमाणे कुसंगत टाळलेली बरी प्रेमात यश मिळेल.
|
 |
महत्त्वाची कामे हातावेगळी कराल
मिथुन : हा आठवडा खर्चात वाढ करू शकतो. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. तसेच रोजच्या वापरातील उपकरणे यावर खर्च होऊ शकतो वाहनाच्या देखभालीच्या खर्चावर वाढ होईल. तसेच घरातील भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी खर्च करण्याची इच्छा होईल आर्थिक आवक मनासारखी राहिल्याने मनसोक्त खर्च करू शकाल चैनी वर खर्च करण्याकडे कल राहील अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल त्याचप्रमाणे एखाद्या कारणाने पैशाचा अपव्यय होऊ शकतो नोकरीत सामान्य परिस्थिती राहून विशेष बदल घडणार नाहीत. महत्त्वाची कामे या आठवड्याच्या पूर्वर्धा मध्ये हातावेगळी कराल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्यांचे कौतुक होईल उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होऊन चांगल्या संधी मिळू शकतात.
|
 |
अपेक्षित सहकार्य मिळू शकते
कर्क : कुटुंब परिवारामध्ये एखादी विवाह सारखे अथवा एखादे मंगल कार्य ठरल्यामुळे लगबग राहील परिवारातील सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकते .अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. खर्चात वाढ होईल.कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे आपण समाधानी राहाल व्यवसाय धंद्यात भरभराट होऊ शकते उलाढाल वाढेल फायद्याचे सौदे हाती येतील मात्र सरकारी धोरणांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो नोकरीधंद्यात आपल्या कर्तुत्वाला वाव मिळेल अधिकार कक्षा रुंदावतील नवीन नवीन संधी उपलब्ध होतील राहत्या घरासाठी अथवा घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल एखाद्या नवीन कार्यक्षेत्राची ओळख होईल राजकारणी जातकांनी आपल्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील आश्वासनांना आवर घालावा .इतरांचा अपमान करू नये अथवा अपमानास्पद वागणूक देऊ नये.
|
 |
इच्छापूर्ती होईल
सिंह : मनासारखी कामे झाल्यामुळे तसेच सतत सकारात्मक प्रतिसाद देत राहिल्याने अनुकुंते मध्ये भर पडेल प्रत्येक क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण होतील विविध प्रकारच्या लाभनि लाभान्वित व्हाल. इच्छापूर्ती होईल कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील मनावरील ताण नाहीसा होईल आरोग्य चांगले राहील त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल आर्थिक आवक चांगली राहिल्याने बचतीचे नियोजन नीट केले जाईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील नोकरीविषयक केलेले प्रयत्न यशस्वी होतील चालू नोकरी मध्ये थोडी दगदग होण्याची शक्यता आहे काम वाढेल घरातील कामे व नोकरी व्यवसायातील उलाढाली यांचा समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे त्यासाठी नियोजन आणि शिस्त गरजेचे ठरेल.
|
 |
कार्य व्याप्ती वाढेल
कन्या : सुरुवातीपासूनच आपली कार्य व्याप्ती वाढेल जास्तीची कामे करावी लागतील कुटुंबातील तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्नांची गरज राहील विशेषतः सरकारी कामे करताना वेळ व खर्च दोन्ही वाढू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येईल. एकाचा राग दुस-यावर काढणे चुकीचे ठरेल स्वतःला शांत राहण्याची गरज संयम ठेवा सबुरीने घ्या आपल्या वागण्यावर आणि बोलल्यावर ती नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील काहींना प्रवास करावा लागेल प्रवास जरी कार्य सिद्ध झाले तरी प्रवासात सामानाची आणि कागदपत्रांची काळजी घ्या चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या वाहनाच्या देखभालीच्या खर्चावर कात्री लावणे धाडसाचे ठरू शकते. नोकरीमध्ये काही वेळा मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. नेहमीच्या कामामध्ये बदल होऊ शकतो तसेच बदली ची तयारी ठेवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
|
 |
कष्टाला फळ मिळेल
तूळ : आपण केलेल्या अथवा घेतलेल्या कष्टाला फळ मिळेल आपल्या धडपडीला या कालखंडात यश मिळेल एखादे महत्त्वाचे काम जे आत्तापर्यंत पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या असे काम पूर्ण करण्यात यश मिळेल जमीन जुमला, स्थायी संपत्ती याविषयी रखडलेले व्यवहार गतिशील होतील व पूर्णत्वाकडे वाटचाल करतील ओळखी मध्यस्ती उपयोगी पडतील कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल. स्पर्धात्मक यश मिळू शकते व्यवसाय धंद्यात चांगली परिस्थिती राहील जुनी येणी वसूल होतील तसेच व्यवसाय विस्ताराच्या बाबतीमध्ये विचार करू शकाल विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात व्यवसायाची भरभराट होईल.
|
 |
फायद्याचे सौदे हाती येतील
वृश्चिक : धनलाभाच्या दृष्टीने सप्ताह चांगली फळे देईल अनेक अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो विविध प्रकारच्या लाभनि लाभान्वित व्हाल.चालू नोकरीत अपेक्षित घटना घडून पदोन्नती अथवा व्यक्तीविरुद्ध मिळू शकते. लहान मोठे प्रवास करावे लागतील जबाबदाऱ्यांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता व्यवसाय धंद्यात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील तसेच व्यवसायिक जुनि नाती नव्याने प्रस्थापित होतील नवीन कर आमदार होऊ शकतात काही फायद्याचे सौदे हाती येतीलकुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील चालू नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे करण्यासाठी हा कालावधी उपयोगी पडेल चैनी वर खर्च करण्याचा कलर राहील काही नवीन खरेदी करू शकाल जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.
|
 |
विविध प्रकारचे लाभ होतील
धनु : कुटुंब परिवारातिल व आपल्या व्यवसाय धंद्यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील आर्थिक परिस्थिती चांगली राहील विविध प्रकारचे लाभ होतील कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन करावे लागेल व्यवसाय धंद्यात काही नवीन बदल करता येतीलव्यवसायात केलेले बदल पोषक ठरतील घरातील कामे व नोकरी यांचा समन्वय साधावा लागेल कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे कार्यमग्न राहाल. जमीनजुमला संपत्ती याविषयीची रखडलेली कामे गतिमान होतील . ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. व्यवसाय धद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील . व्यवसाय धंद्यातील कामगारांचे अपेक्षित सहकार्य मिळेल परंतु सरकारी नियम व कायदे पाळणे जरुरीचे ठरेल सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
|
 |
कार्यमग्न रहा
मकर : महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक काही अडचणी उद्भवल्या मुळे काम पूर्ण होण्यास थोडासा अवधी लागेल, विलंबाने कामे होतील निराश न होता आपल्या कार्यात कार्यमग्न रहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका. नोकरीविषयक प्रयत्न सफल होतील पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती सफल होऊन नोकरीसाठी बोलावणे येईल विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस मधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल कुटुंब परिवारात आनंददायक वातावरण राहून नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील.काहींचे विवाह ठरतील परिचयोत्तर विवाह ठरण्याची शक्यता. कुटुंब परिवारात सर्वांचे सहकार्य मिळेल जब से धंद्यातील परिस्थिती समाधान कारक राहून उलाढाल वाढेल भागीदारीच्या व्यवसायात वाद-विवाद यांपासून दूर राहा भागीदाराचे पूर्ण पडणे अथवा मत नीट ऐकून घ्या समजून घ्या मगच आपले मत प्रदर्शित करा.
|
 |
वाद-विवाद दुर्लक्षित करा
कुंभ : आपल्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण झाल्याने आपल्या स्वभावात चिडखोर पणा येईल त्यामुळे इतरांवर राग निघण्याची शक्यता, होणारे काम होणार नाही म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या. विशेषतः जीवनसाथी बरोबर होणारे वाद-विवाद दुर्लक्षित करा. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे तसेच राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. घरातील उपकरणे तसेच वाहने यांच्या देखभालीच्या खर्चा मध्ये वाढ होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. पण खर्च आवश्यक असल्याने ते करावेच लागतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती आशादायक असेल. नवीन योजना सफल होईल. आर्थिक मदतीची गरज भासल्यास ती पूर्ण होऊ शकते.बँकांची कामे होतील. पैशाची व्यवस्था होऊ शकते.
|
 |
नवीन खरेदी होईल
मीन : आपल्या कर्तृत्वाला वाव मिळून कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठराल एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामगिरीसाठी आपली निवड होऊ शकते परदेश गमन. खेळाडू कलाकार यांना अनुकूल कालावधी. केलेल्या कष्टाचे चीज होईल प्रसिद्धी बरोबरच अर्थार्जन यामध्ये वाढ होईल. एकूणच आर्थिक आवक चांगली राहिल्यामुळे खर्च मला स्वतः करू शकाल कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी होईल राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. सुशोभीकरणासाठी खर्च होऊ शकतो व्यवसाय धंद्यात विविध प्रकारचे लाभ होण्याची शक्यता जुनी येणी वसूल होतील मात्र वसुली करताना आपल्या बोलल्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवा गोड बोलून कामे लवकर होतात हा अनुभव येईल मालमत्ता जमीन-जुमला याविषयीच्या व्यवहारात यश मिळेल.
|