मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय मोरेला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. आरोपी चालक मोरेने यापूर्वी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले. यासह अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मोरे हा गेल्या वर्षभरापासून कोठडीत आहे. मोरे हा अनुभवी चालक असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद मोरेच्या वकिलांनी केला. पण इलेक्ट्रिक बस चालवण्याचे केवळ ३ दिवसांचे प्रशिक्षण त्यामुळे अशा बस चालवण्याचा अनुभवाचा अभाव असल्याचे सरकारी वकिलांनी निरिक्षण नोंदवले. मात्र,अखेर सव्वा वर्षानंतर संजय मोरेला जामीन मंजूर करण्यात आलाय.