Monday, March 16, 2026

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर

तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण खाल्याने अनेक चमत्कारिक फायदे होतात. लसनाप्रमाणे मधाचे सेवन देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते.

आयुर्वेदानुसार, जर तुम्ही वाढत्या कोलेस्ट्रॉलनं त्रस्त असाल तर लसणाच्या कच्च्या पाकळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. लसणात 'एलिसिन' नावाचं गुणकारी घटक असतं. हे एक प्रकारचं नैसर्गिक प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट असून याचं सेवन केल्यानं शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच, यामुळे रक्तही जाड होत नाही. लसणामध्ये असलेलं सल्फर आणि इतर रसायने लसणाला बॅक्टेरियाविरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म प्रदान करतात.

तसेच, मध हा निसर्गाचा एक अनमोल ठेवा असून मधुमेह असलेल्या व्यक्तींवरही मधाचा फारसा परिणाम होत नाही. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनोल्स हे दोन महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे, शरीरातील खाज, लालसरपणा कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. मधामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म विविध आजारांशी लढण्यासाठी अंत्यत उपयुक्त ठरतात.

लसूण आणि मध या दोन्ही मिश्रणांना आपल्या शरीरासाठी अमृत मानलं जातं. हे दोन्ही मिश्रण श्वसनाचे आजार, संसर्ग, त्वचा रोग, हृदयविकार आणि पोटासंबधित समस्यांवर अत्यंत प्रभावी ठरतात. यामुळे सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच, रक्त पातळ होऊन 'स्ट्रोक'चा धोका कमी होतो.

याबरोबरच उच्च रक्तदाब, संधिवात, दातदुखी आणि बद्धकोष्ठतेसाठीही हे अत्यंत गुणकारी मानलं जातं. त्यामुळे या दोन्ही मिश्रणाचं नियमितपणे सेवन करणं आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

असे तयार करा लसूण आणि मधाचे चमत्कारिक मिश्रण :

एका स्वच्छ काचेच्या बरणीत ताज्या लसणाच्या पाकळ्या सोलून टाका. त्यात शुद्ध मध घालून बरणी पूर्ण भरा. ५ ते ७ दिवस हे मिश्रण तसेच राहू द्या (मिश्रण छान मुरू द्या) त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.

टीप: लहान मुले आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे.

Comments
Add Comment