Tuesday, July 21, 2026

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

- ६० किमी वेगाने वाहणार वारे

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सोमवारी शहरातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) २१ जुलैसाठी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Maharashtra Rain Update)

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा :

IMD च्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांतही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Rain Update)

मुंबईतील अनेक भागांत पावसाची हजेरी :

सोमवारी दिवसभर मुंबईतील अंधेरी, वांद्रे, विलेपार्ले, दादर, भांडुप आणि मुलुंड या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही आणि शहरात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Rain Update)

हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत :

पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) सध्या ५६ इतका नोंदवण्यात आला असून तो 'मध्यम' (Moderate) श्रेणीत आहे. शहरातील वाळकेश्वर येथे AQI ५५, तर नेव्ही नगर (कुलाबा) येथे ५८ इतका नोंदवला गेला. मात्र राजीव गांधी नगर येथे AQI १४४ पर्यंत पोहोचल्याने त्या भागातील हवेची गुणवत्ता 'खराब' (Poor) श्रेणीत नोंदवली गेली. (Maharashtra Rain Update)

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन :

गेल्या महिनाभरात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवांवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, हवामानाच्या ताज्या सूचना लक्षात ठेवाव्यात आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. (Maharashtra Rain Update)

प्रशासनानेही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अधिकृत हवामान सूचना नियमितपणे तपासत राहाव्यात. (Maharashtra Rain Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >