बुमराहलाही टाकले मागे
नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या धारदार गोलंदाजीने इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तीन विकेट्स घेत अर्शदीपने केवळ भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले नाही, तर जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने आपल्या ४ षटकांच्या केवळ २४ धावा देऊन ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा, रायन बर्ल आणि टोनी मुनयोंगा यांना बाद करून प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. या कामगिरीसह अर्शदीपच्या खात्यात चालू विश्वचषकात आतापर्यंत ८ विकेट्स जमा झाल्या आहेत. या कामगिरीसह त्याने ट्रेन्ट बोल्टचा रेकॉर्ड मोडला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान आता अर्शदीपला मिळाला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा (३४ विकेट्स) विक्रम मोडीत काढला.
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बांगलादेशचा शकिब अल हसन ५० विकेट्ससह (४३ सामने) पहिल्या स्थानी कायम आहे.







